इंधनाचा तुटवडा आणि विजेची वाढती मागणी यामुळे पर्यायी इंधनाचा शोध घेण्याकडे विविध देशांनी सुरुवात केली आहे. हायड्रोजनद्वारे कार, बाईक चालविल्याच्या बातम्याही अधून मधून येत असतता. पण जगातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सोमवारी जर्मनीमध्ये धावली आहे. यामुळे प्रदुषणावर मात करणे शक्य होणार आहे.
ट्रेनची डिझेल इंजिने मोठ्या प्रमाणावर हवेत धूर सोडतात. विजेवर चालणारी इंजिनांनाही मोठ्या प्रमाणावर वीज लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वीज उपलब्ध करणे शक्य नसते. यामुळे जगभरातील संशोधक पर्यायी असलेल्या हायड्रोजनवर संशोधन करत आहेत. सोमवारी चक्क ट्रेन धावल्याने हायड्रोजन इंधनामुळे नवा पर्याय समोर आला आहे.
पहा व्हिडिओ जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन जर्मनीमध्ये धावली सोमवारी जर्मनीतील कक्सहेवन ते बुक्सटेहूड या 100 किमीच्या अंतरावर ही ट्रेन धावली. या ट्रॅकवर नेहमी डिझेलची इंजिन धावतात. हायड्रोजनवर ट्रेन धावल्यामुळे शून्य वायू उत्सर्जन झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच ही ट्रेन यापुढे हायड्रोजनवर धावणार आहे. अशा ट्रेनची संख्याही वाढविण्यात येणार असल्याचे जर्मनीच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 2021 पर्यंत अलस्टोम येथील प्रकल्पातून 14 ट्रेन मिळणार आहेत.
काय आहे हायड्रोजन तंत्रज्ञान?हायड्रोजन ट्रेनमध्ये इंधन सेल असून त्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सजनच्या वापरातून वीज तयार केली जाते. वाफ आणि पाण्यापासून ही वीज बनते. जादा बनलेली विज बॅटऱ्यांमध्ये साठविली जाते. ही ट्रेन एकदा हायड्रोजन भरला की 1000 किमीचे अंतर पार करू शकते. डिजेलचे इंजिनही एवढेच अंतर कापते.