ऑनलाइन लोकमतब्राझील, दि. 13 - ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष लुइस इनासिओ लुला दा सिल्वा यांना भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाने बुधवारी नऊ वर्षं सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. पेट्रोब्रास कंपनीकडून लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता. दरम्यान, न्यायालयाने त्यांना निर्णयाविरुद्ध अपील करण्यास मुभा दिली आहे.लुला दा सिल्वा हे सत्तेवरुन सहा वर्षापूर्वी पायउतार झाले आहेत. सामाजिक परिवर्तनवादी नेता अशी त्यांनी जागतिक पातळीवर प्रशंसा मिळवली आहे. आपण कुठलाच भ्रष्टाचार केला नसून हे आपल्याविरुद्ध राजकीय षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर गेल्या वर्षीसुद्धा ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षा डिल्मा रोसेफ (68) यांना पदावरून हटविण्यात आले होते. राष्ट्रीय अर्थसंकल्पात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला होता. राष्ट्राध्यक्षांना हटविण्यासाठी दोन तृतीयांश मतांची गरज असते. डिल्मा रोसेफ यांना महाभियोगात 81 पैकी 61 सिनेटर्सनी दोषी ठरविले होते. त्यानंतर त्यांना तात्काळ पदावरून हटविण्यात आले. यामुळे डाव्या विचारांच्या 13 वर्षांच्या शासनाचा अंत झाला होता.
ब्राझीलच्या माजी राष्ट्राध्यक्षांना कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2017 6:53 AM
ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष लुइस इनासिओ लुला दा सिल्वा यांना भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाने बुधवारी नऊ वर्षं सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली
दरम्यान, मायकल टेमर हे आता ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष आहेत. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग स्क्रीनवरील ही आकडेवारी समोर आल्यानंतर अनेक सिनेटर्सच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. दरम्यान, डिल्मा रोसेफ यांच्या निवासस्थानाबाहेर पन्नासहून अधिक डाव्या विचारांचे आंदोलक त्यांच्या समर्थनार्थ एकत्र आले होते.लोकशाहीच्या संरक्षणासाठी आमचे आंदोलन असल्याचे ते सांगत होते. तत्पूर्वी 14 तास चाललेल्या मॅरेथॉन चौकशीत आपली बाजू मांडताना डिल्मा रोसेफ यांनी सांगितले की, आपण निर्दोष आहोत. बेरोजगारी आणि महागाईमुळे देशात अनेक समस्या निर्माण झाल्या असताना राजकीय पातळीवरही देशात वर्षभरापासून असंतोष होता. त्यामुळे कोणत्याही कायद्याचं मी उल्लंघन केलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.