इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना भ्रष्टाचार प्रकरणामध्ये न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच, शरीफ यांची मुलगी मरियम शरीफ हिला ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच शरीफ यांना ८ मिलियन पाऊंडचा दंड, तर मरियमला २ मिलियन पाऊंडच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.