लंडन : मूळ बांगलादेशातील असणारे लंडनमधील चार युवक इस्लामी स्टेटसाठी लढण्यासाठी सिरियाला रवाना झाले असून, स्कॉटलंड यार्ड त्यांचा शोध घेत आहेत. जिहादसाठी गेलेल्या या युवकात दोन भावंडे असून त्यांचे वय १७ व २० आहे. ते कामडेन येथील रहिवासी आहेत. राहिलेले दोघे यांचे चुलत भाऊ असून, ते मिडलँड भागात राहतात. त्यांची वयेही १९ व २२ आहेत. या चार जणांचे नागरिकत्व ब्रिटिश असून, त्यांनी एकत्र तुर्कस्तानची राजधानी इस्तंबुल येथून सिरियाच्या सीमेत प्रवेश केला आहे. सप्टेंबर महिन्यात हे चौघे सिरियात गेले.
चार ब्रिटिश युवक इसिसमध्ये दाखल
By admin | Published: December 01, 2014 12:11 AM