ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. १४ - अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे एका ख्यातनाम हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोघा भारतीयांसह पाच विदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रात्रभर सुरु असलेल्या चकमकीत स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी एका दहशतवाद्याला ठार मारले आहे.
बुधवारी रात्री काबूलमधील कोलोला पुश्त येथील पार्क पॅलेस हॉटेलमध्ये संगीताचा कार्यक्रम होणार होता. हा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी बंदुकधारी दहशतवाद्यांनी हॉटेलवर हल्ला केला. पोलिस व विशेष सुरक्षा पथकाच्या जवानांनी हॉटेलमध्ये अडकलेल्या ४४ जणांची सुटका केली. तर पाच जणांना दहशतवाद्याने ठार मारले. यात चार भारतीय व एक अमेरिकेच्या नागरिकाचा समावेश आहे. या हॉटेलमध्ये तीन भारतीय राहत होते. हे तिघेही सध्या भारतीय दुतावासात सुरक्षित असल्याचे अफगाणिस्तानमधील भारताच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले. या हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चिंता व्यक्त केली आहे.