बँकॉक : थायलंडमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ बँकॉक आणि फुकेटसह दक्षिणेतील पाच प्रांतांत गेल्या २४ तासांत झालेल्या ११ बाँबस्फोटांत चार जण ठार तर अनेक जण जखमी झाले. थायलंडने काही दिवसांपूर्वी लष्कराचा पाठिंबा असलेल्या राज्यघटनेचा स्वीकार केल्यानंतरचे हे स्फोट आहेत. मात्र हा दहशतवादाचा प्रकार नाही, असे तेथील पोलिसांनी म्हटले आहे.झालेले स्फोट हे जुळे स्फोट आहेत. येथील प्रसिद्ध क्लोक टॉवरनजिक शुक्रवारी सकाळी हुआ हिन रिसॉर्टमध्ये बाँबचे दोन स्फोट झाले त्यात एक जण ठार तिघे जखमी झाले. आम्ही एकमेकांपासून फार दूर अंतरावर नव्हतो, असे पोलीस लेफ्टनंट कर्नल सॅमाएर युसुमरान यांनी सांगितले. येथून सुमारे २०० मीटर दूर गुरुवारी आणखी दोन बाँबस्फोट झाले. विदेशी पर्यटक आपापल्या हॉटेल्सच्या खोल्यांकडे जाण्यासाठी स्थानिक बार्समधून बाहेर पडताच हे स्फोट झाले. (वृत्तसंस्था)
थायलंडमध्ये ११ बॉम्बस्फोटांत ४ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2016 2:19 AM