पॅरिस - एकीकडे जर्मनीमध्ये मुस्लिमांविरोधात जोरदार आंदोलने सुरू असतानाच फ्रान्सनेही आपल्या देशातील फुटीरतावादी आणि दहशतवादी कारवायांना वेसण घालण्याच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. बाहेरील देशातून फ्रान्समध्ये येणाऱ्या इमाम आणि इस्लामी शिक्षकांना देशात येण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशी घोषणा फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉ यांनी केली आहे. फुटीरतावाद आणि दहशतवादी कारवाया रोखण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलल्याचे मॅक्रॉ यांनी सांगितले.
इमॅन्युअल मॅक्रॉ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की , आम्ही २०२० नंतर फ्रान्समध्ये अन्य कुठल्याही देशातून येणाऱ्या मुस्लिम इमामांवर बंदी घातली आहे. फुटीरतावाद आणि दहशतवादी कारवाया रोखण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे. तसेच मशिदींना कशाप्रकारे वित्तपुरवठा होतो. त्यामध्ये पारदर्शकपणा आणण्यासाठी नव्या कायद्याचा मसुदा तयार करण्यात येत आहे. अल्जेरिया, मोरक्को, तुर्कीसह इतर देशातून मशिदींमध्ये शिकवण्यासाठी इमाम येत असतात. २०२० नंतर परदेशातून कुणीही इमाम फ्रान्समध्ये येणार नाही यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश आम्ही फ्रेंच मुस्लिम कौन्सिलला दिले आहेत .’’
‘तसेच सध्या फ्रान्समध्ये असलेल्या परदेशातील इमामांना फ्रेंच शिकण्यास सांगावे, त्याबरोबरच या इमामांनी कुठल्याही परिस्थितीत कट्टरवादाला खतपाणी घालू नये. तसेच कुठल्याही प्रकारच्या दहशतवादी कारवायांत त्यांनी सहभागी होऊ नये. फ्रान्सच्या कायद्यांचे रक्षण करावे, याबाबत त्यांना सूचित करण्याचे निर्देश फ्रेंच मुस्लिम कौन्सिलला देण्यात आले आहेत,’ असे मॅक्रॉ यांनी सांगितले.
संबंधित बातम्या
भारताच्या ताफ्यात राफेल; तर फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या ताफ्यात मेड इन इंडिया स्कूटर
तिसरं महायुद्ध अन् ७० वर्षांतील सगळ्यात मोठी घटना; फ्रेंच भविष्यवेत्त्याचं २०२० साठीचं भयंकर भविष्य
काश्मीरप्रश्नी फ्रान्सची भारताला साथ, द्विपक्षीय चर्चेतून तोडगा काढण्याचा दिला सल्ला
‘सर्वच दहशतवादी मुस्लिम असतात असे नाही. मात्र बऱ्याच प्रकरणात इस्लामिक दहशतवादच समोर आला आहे. त्यामुळे आम्ही याप्रकारचे पाऊल उचलले आहे. फ्रान्समधील सर्व धर्माच्या नागरिकांनी देशाचे रक्षण करावे. तसेच या देशाच्या कायद्याचे पालन करावे,’’