ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. १६ - पॅरिस हल्ल्याच्या दोन दिवसानंतर फ्रान्सने इसिसविरोधात मोहीमच सुरु केली आहे. फ्रान्सच्या लढाऊ विमानांनी सीरियातील रक्का येथे इसिसच्या तळांवर दहा ठिकाणी हल्ला केला आहे.
शुक्रवारी इसिसच्या दहशतवाद्यांनी पॅरिसमध्ये नरसंहार घडवत सहा ठिकाणी दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात १२९ जणांचा मृत्यू झाला होता तर सुमारे ३५० जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर इसिसला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी फ्रान्सने केली होती. हल्ल्याच्या दोन दिवसानंतर फ्रान्सने अमेरिकन सैन्याच्या साथीने सीरियातील इसिसच्या तळांवर हवाई हल्ला केला फ्रान्सच्या दहा विमानांनी सुमारे २० बॉम्ब टाकले. रक्का येथील इसिसचे कमांड सेंटर, दहशतवाद्यांचे शिबीर याला प्रामुख्याने लक्ष केल्याचे फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिका-यांनी सांगितले.