न्यू याॅर्क : भारतातून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव माेदीच्या भावाने अमेरिकेत माेठा घाेटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. सुमारे २६ लाख डाॅलर्स किमतीच्या हिरे खरेदी प्रकरणात अमेरिकेतील एका माेठ्या हिऱ्यांच्या कंपनीची फसवणूक केल्याचा आराेप नेहाल माेदीवर ठेवण्यात आला आहे.न्यूयाॅर्क येथील सर्वाेच्च न्यायालयात नेहालविरुद्ध खटला चालविण्यात येणार आहे. नेहालने मार्च ते ऑगस्ट २०१५ या कालावधीत ‘एलएलडी डायमंड्स’ या कंपनीची फसवणूक करून कर्जावर हिरे खरेदी केले. हिरे मिळविण्यासाठी नेहालने ‘काॅस्टकाे हाेलसेल काॅर्पाेरेशन’ या कंपनीसाेबत व्यवहार करत असल्याच्या थापा मारल्या. कंपनीकडून हिरे प्राप्त झाल्यानंतर ते ‘माॅडेल काेलॅटेरल लाेन्स’ या कंपनीकडे तारण ठेवून कर्ज घेतले. ‘एलएलडी’ला विश्वासात घेण्यासाठी त्याने पैसे परत केले. परंतु, त्यानंतर कंपनीने विक्रीसाठी पुरविलेले हिरे त्याने परस्पर कमी किमतीत विकून स्वत:साठी खर्च केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीने त्याच्याविराेधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. इंटरपाेलने नेहालविराेधात रेड काॅर्नर नाेटीसही बजावली आहे. त्याच्या वकिलाने मात्र नेहाल दाेषी नसून हा व्यावसायिक खटला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. (वृत्तसंस्था)
सन २०१५ मधील प्रकरणनोबेल टायटन होल्डिंग्स या नावाच्या एका फर्मच्या माध्यमातून नेहलने मार्च ते ऑगस्ट २०१५ दरम्यान एलएलडी डायमंडस (अमेरिका) या कंपनीला चुकीची माहिती पुरविली. त्याचप्रमाणे या कंपनीकडून २६ लाख डॉलरचे हिरे उधारीवर मिळविले. त्यांची परस्पर विक्री करून हे पैसे स्वत:कडेच ठेवून नेहल यांनी कंपनीची फसवणूक केली आहे.