Online Payment Fraud: एका नर्स काम असतं की, तिने हॉस्पिटलमधील रूग्णांची काळजी घ्यावी. पण जेव्हा नर्सच रूग्णांच्या पैशांवर हात साफ करत असेल तर काय बोलावं? अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात एका नर्सने मृत रूग्णच्या अकाऊंटमधून कोट्यावधी रूपये गायब केले. 46 वर्षीय या नर्सला या कारणाने तुरूंगातही जावं लागलं. पण नर्स म्हणाली की, रूग्णाच्या सांगण्यावरूनच तिने पेमेंट ट्रान्सफर केलं होतं. पण याप्रकरणात प्रश्न हा आहे की, रूग्णाच्या मृत्यूनंतर पेमेंट ट्रान्सफर कसं झालं? रूग्णाच्या मुलाने याबाबत तक्रार केली. चला जाणून घ्या काय आहे प्रकरण...
Thethaiger च्या रिपोर्टनुसार, 46 वर्षीय नर्सचं नाव सतांग थोंग्रमफान आहे. संतागवर रूग्णाच्या मुलाने आरोप केला की, तिने मृत रूग्ण म्हणजे त्याच्या वडिलांचा मोबाइल चोरी केला. त्यानंतर ऑनलाईन बॅंकिंगच्या माध्यमातून 3 कोटी 44 लाख रूपये स्वत:च्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले.
कसा झाला खुलासा?
रूग्णाचा मुलगा पतिवत थायसोम याने नर्सची तक्रार पोलिसांकडे केली. तक्रारीनंतर पोलिसांनी नर्स सतांगला तिच्या घरातून अटक केली. पतिवतने सांगितलं की, त्याचे वडील बॅंकेत नोकरी करत होते. त्यांना कॅन्सरच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान 9 ऑगस्ट 2022 ला त्यांचं निधन झालं. त्यानंतर वडिलांचा मोबाइल हॉस्पिटलमधून चोरी झाला. नंतर समजलं की, त्यांच्या खात्यातून पैसेही गायब झाले.
घरात सापडले 50 लाख रूपये रोख
तक्रारीनंतर पोलीस नर्सच्या घराची झडती घेण्यासाठी गेले तेव्हा जे दिसलं ते बघून पोलिसही हैराण झाले. चौकशी दरम्यान पोलिसांना 50 लाख रूपये कॅश, सोनं आणि एक कार सापडली. त्याशिवाय तिच्या घरात 6 बॅंकेचे पासबुकही सापडले. चौकशी दरम्यान तिने सांगितलं की, हे करण्यासाठी तिला रूग्णानेच सांगितलं होतं. दरम्यान, तिने रूग्णाच्या बॅंक अॅपच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केले आणि जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त पैसे ट्रान्सफर केले.