शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

कोरोनाला कमी समजणं या 'अंडरटेकर'ला पडलं महागात, ओव्हर कॉन्फिडन्समुळे गेला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 3:06 PM

Frederic Sinistra Death : तो त्याच्या शारीरिक शक्तीने कोरोनाला मात देईल. एकप्रकारे फ्रेडरिकने कोरोनाला खुलेआम आव्हान दिलं होतं. पण ते त्याला महागात पडलं.

Frederic Sinistra Death : तीनवेळा किक बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला फ्रेडरिक सिनिस्ट्राचं वयाच्या ४१ व्या वर्षी निधन झालं. फ्रेडरिक सिनिस्ट्राला अंडरटेकर नावानेही ओळखलं जात होतं. फ्रेडरिक सिनिस्ट्राला कोरोनाची (Corona Virus) लागण झाली होती आणि त्याने हट्टाने ठरवलं होतं की, तो त्याच्या शारीरिक शक्तीने कोरोनाला मात देईल. एकप्रकारे फ्रेडरिकने कोरोनाला खुलेआम आव्हान दिलं होतं. पण ते त्याला महागात पडलं.

कोरोनाला हलक्यात घेणं पडलं महागात

फ्रेडरिक सिनिस्ट्राने त्याच्या हट्टापाई वॅक्सीन घेतली नव्हती. फ्रेडरिक आधीपासूनच कोरोनाच्या गाइडलाईन फालतू असल्याचं सांगत त्या फॉलो करण्यास नकार देत होता. याच कारणाने त्याने ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कोरोनाची वॅक्सीनही घेतली नव्हती. कोरोना व्हायरस आणि वॅक्सीनबाबत अनेक लोकांप्रमाणे हे मानत होते की, हा केवळ एक खेळ आहे आणि शरीराने मजबूत असलेल्या लोकांवर अशा अफवांचा काहीच परिणाम होत नाही.

फ्रेडरिक सिनिस्ट्रा गमतीत असंही म्हणत होता की, जर कोरोनासोबत त्याला दोन हात करावे लागले तर तो त्याच्या शारीरिक शक्तीने त्याला मात देणार. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना गाइडलाईन्सचं उल्लंघन करणाऱ्या या शक्तीशाली व्यक्तीला नोव्हेंबरमध्ये कोरोनाची लागण झाली होती. 

ओव्हर कॉन्फिडन्समुळे गेला जीव

कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याने दिवसेंदिवस फ्रेडरिकची तब्येत अधिक बिघडत गेली. अखेर त्याची तब्येत इतकी बिघडली की, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. आणि उपचारादरम्यान त्याचं निधन झालं.

फ्रेडरिकला जेव्हा हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं तेव्हा त्याची तब्येत इतकी बिघडली होती की, त्याला थेट आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं होतं. हॉस्पिटलमध्ये दाखल करतानाही त्याला स्वत:वर विश्वास होता आणि आपल्या फॅन्सना तो म्हणाला होता की, या आजारावर मात करून तो लवकरच आपल्या लोकांमध्ये परत येईल. त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी हे मानायलाच तयार नव्हती की, तिच्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीय