कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी इस्लामिक कट्टरता आणि अभिव्यक्ती स्वतंत्र्यासंदर्भात आपले मत व्यक्त केले आहे. पंतप्रधान ट्रूडो यांनी शुक्रवारी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बचाव केला. मात्र याच बरोबर, याला एक सीमा असते असेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, कुठल्याही समाजाच्या भावना जाणूनबुजून दुखावणे चुकीचे असल्याचेही कॅनाडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी म्हटले आहे.
फ्रान्समधील व्यंग्यचित्र मॅगझीन शार्ली हेब्दोमध्ये छापल्या गेलेल्या पैगंबर मोहम्मदांच्या व्यंगचित्रावरून (cartoons) ट्रुडो यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ट्रुडो म्हणाले, आम्ही नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बचाव करू. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही एक सीमा आहे. आपण इतरांचा सन्मान करायला हवा. तसेच ज्यांच्यासोबत आपण हा समाज आणि भूभाग शेअर करत आहोत त्यांना जाणूनबुजून दुखवू नये.
मुस्लिमांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा पूर्ण अधिकार; मलेशियाचे माजी PM महातिर मोहम्मद यांचं प्रक्षोभक वक्तव्य ट्रुडो म्हणाले, आपण आपल्या स्वातंत्र्याच्या नावाखाली दहशत निर्माण करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. ते म्हणाले बोलण्याच्या स्वातंत्र्याचा सतर्कतेने वापर व्हायला हवा. तर, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी पैगंबर मोहम्मदांचे व्यगचित्र छापण्याच्या निर्णयाचा जोरदार बचाव केला होता. एवढेच नाही, तर काही झाले तरी आपण झुकणार नाही, असे मॅक्रॉन यांनी म्हटले होते.
तत्पूर्वी, फ्रान्सच्या नीस शहरातील चर्चमध्ये गुरुवारी झालेल्या हल्ल्यात तील जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर संबंधित हल्लेखोर ट्यूनिशियाचा नागरिक असल्याचेही समोर आले होते. हल्ल्यानंतर या हल्लेखोराला अटक करण्यात आली होती. कॅनडाच्या संसदेत गुरुवारी पीडितांसाठी एक मिनिटांचे मौन पाळले. तसेच, कॅनडा फ्रान्समध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो आणि या कठीन परिस्थितीत आपल्या फ्रेंच मित्रांसोबत उभा आहे, असेही ट्रुडो यांनी म्हटले होते.
"नेहमी एकाच समाजाचे लोक आग का लावतात?;" भोपाळमधील मुस्लीम रॅलीवर बाबा रामदेव म्हणाले...
फ्रान्समध्ये गेल्या महिन्यातच क्लासरूममध्ये पैगंबर मोहम्मदांचे व्यंगचित्र दाखवणाऱ्या एका शिक्षकाचीही हत्या झाली होती. हा इस्लामिक दहशतवादी हल्ला असल्याचे मॅक्रॉन यांनी म्हटले होते. फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या या वक्तव्यावर अनेक देशांतून टीकाही झाली होती. तसेच त्यांचे हे वक्तव्य इस्लामोफोबिया वाढवणारे असल्याचे म्हटले गेले होते. एवढेच नाही, तर फ्रान्सच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही करण्यात आले होते.
Nice Attack: हातात कुराण अन् चाकू घेऊन चर्चमध्ये घुसला हल्लेखोर; ३ जणांना केलं ठार