शहरं
Join us  
Trending Stories
1
१०-१५ दिवसांत आचारसंहिता? जागावाटपावर सलग ३ दिवस मविआची बैठक; महायुतीही एक्टिव्ह मोडवर
2
केंद्राकडून संवेदनशील सूचना, तीन मुख्य न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांच्या शिफारशीमध्ये मोठा बदल
3
...तर 'या' दिवशी केजरीवाल सरकारी बंगला रिकामा करतील, सुरक्षाही घेणार नाहीत, संजय सिंहांनी दिली संपूर्ण माहिती
4
Team India चा पुढचा ट्वेंटी-२० कर्णधार कोण असेल? रैनाच्या उत्तरानं उंचावल्या भुवया
5
बांगलादेश होणार मालामाल, आधी अमेरिका मग जागतिक बँक देणार २ अब्ज डॉलर्सची मदत
6
तीन वर्षांपासून प्रसिद्ध अभिनेत्री बेरोजगार; म्हणाली, "घर चालवायचं आहे, बिलं भरायची आहेत..."
7
पितृपक्ष: दत्तगुरु उपासनेने लाभ, पितृदोषावर ‘हा’ मंत्र अत्यंत प्रभावी; जप करा, कृपा मिळवा
8
जम्मू काश्मीरमध्ये भाजपला दिलासा, हिंदू मतदारांमध्ये उत्साह; ९ वाजेपर्यंत ११ टक्के मतदान
9
२ लाखांचा DD घेऊन मोहन चव्हाण 'मातोश्री'वर पोहचले; पोलिसांनी गेटवरच अडवले, काय आहे प्रकरण?
10
Modi Familyच्या वादावर अखेर तोडगा निघाला! आईचं भावनिक वक्तव्य; म्हणाल्या, "वडिलांचा वारसा..."
11
किंग कोहलीनं 'त्या' ट्विटसह चाहत्यांना टाकलं कोड्यात; मग काही वेळात स्वत:च सोडवलं कोडं
12
पितृपक्ष: प्रारंभी चंद्रग्रहण, समाप्तीला सूर्यग्रहण; ६ राशींना शुभ-लाभ, ६ राशींना खडतर काळ!
13
Pager Explosion : पेजरमध्ये बसवून घडवले स्फोट, ते PETN स्फोटक काय?
14
अंत्यसंस्कारासाठी एक मिनिटही नव्हतं का?; कामाच्या ताणामुळे मुलीचा मृत्यू, आईने कंपनीला लिहीलं पत्र
15
गणपतीला अर्पण केलेला लाडू १ कोटी ८७ लाखांना विकला; दरवर्षी होतो लिलाव
16
हिजबुल्लाहसाठी पेजर बनवणारी तैवानी कंपनीचा खुलासा; युरोपियन कनेक्शन जोडले
17
महागड्या रिचार्जपासून होणार सुटका! सरकार ५ कोटी Wi-Fi हॉटस्पॉट बसवणार, स्वस्तात मस्त Unlimited इंटरनेट मिळणार!
18
Reliance Jio चा धमाका; Jio 91 Recharge मध्ये संपूर्ण महिन्यासाठी मिळणार Unlimited Calling, Data
19
'तुंबाड' फेम सोहम शाहने केलं अनिता दातेचं कौतुक, म्हणाला- "सिनेमात तिच्याबरोबर काम करताना..."
20
PItru paksha 2024: एरव्ही न केली जाणारी आमसुलाची चटणी श्राद्धाच्या नैवेद्याचा मुख्य जीवच; वाचा कृती!

"पश्चिम बंगालला मोदींच्या सत्तेपासून मुक्त करा,स्वातंत्र्याची घोषणा करा’’, बांगलादेशी दहशतवाद्याचं ममता बॅनर्जींना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 12:16 PM

Bangladesh Terrorist Jashimuddin Rahmani News: सत्तांतरानंतर बांगलादेशमधील अंतरिम सरकारने बांगलादेशमधील कट्टरतावादी दहशतवादी जसीमुद्दीम रहमानी याला तुरुंगातून मु्क्त केले होते. आता अल कायदाशी संबंधित असलेला हाच रहमानी भारताविरोधात गरळ ओकत आहे.

आरक्षणावरून सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर बांगलादेशमध्ये सत्तांतर होऊन आता महिना उलटला आहे. मात्र या सत्तांतरानंतरही  बांगलादेशमध्ये अनेक उलथापालथी होत आहेत. दरम्यान, सत्तांतरानंतर बांगलादेशमधील अंतरिम सरकारने बांगलादेशमधील कट्टरतावादी दहशतवादी जसीमुद्दीम रहमानी याला तुरुंगातून मु्क्त केले होते. आता अल कायदाशी संबंधित असलेला हाच रहमानी भारताविरोधात गरळ ओकत आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना आश्रय देण्यावरून एका व्हिडीओमधून रहमानी याने शेख हसिना यांच्याविरोधात गरळ ओकली आहे. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही व्हिडीओमधून धक्कादायक असं आवाहन केलं आहे.  

एबीटीचा प्रमुख असलेल्या रहमानी याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तसेच त्यामध्ये तो काश्मीरच्या स्वातंत्र्याबाबत बोलताना दिसत आहे. तसेच पश्चिम बंगाललाहीभारतापासून वेगळे करण्याबाबत मुक्ताफळे उधळत आहे. त्याने पश्चिम बंगालला मोदींच्या सत्तेमधून मुक्त करण्याचं आणि स्वातंत्र्याची घोषणा करण्याचं आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केलं आहे. 

रहमानी हा बऱ्याच दिवसांपासून तुरुंगात होता. मात्र बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने रहमानी याची मुक्तता केली होती. तेव्हापासून तो भारताविरोधात वक्तव्य करत आहे. दरम्यान, याआधी रहमानी याने भारताचं चिकन नेक समजल्या जाणाऱ्या सिलिगुडी कॉरिडॉरला कापून पूर्वोत्तर राज्यांना देशाच्या इतर भागापासून तोडण्यासाठी चीनला मदत करण्याबाबतही विधान केलं होतं. तसेच बांगलादेशविरोधात कुठलाही आक्रमक कारवाई करण्याविरोधात भारताला धमकी दिली आहे. बांगलादेश हा सिक्कीम किंवा भूतानसारखा नाही. हा १८ कोटी मुस्लिमांचा देश आहे, असा दावा त्याने केला आहे.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीterroristदहशतवादी