ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - आयुष्यात आपण कितीही मोठे झालो तरी एक गोष्ट नेहमी गरजेची असते ते म्हणजे मित्र. मित्र नसतील तर जगण्याला काहीच अर्थ नाही. कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचं नातं श्रेष्ठ ठरतं. पण अनेकदा आपल्या आयुष्यात असे काही मित्र असतात ज्यांना पाहून असे मित्र असण्यापेक्षा शत्रु असलेले बरे असं वाटत असतं. असं वाटण्यामागे आपला काही राग नसतो. पण काही मित्र खरंच इतका त्रास देतात की तू का आलास माझ्या राशीला असा प्रश्न पडतो. पण खरं सांगायचं तर याच मित्रांमध्ये आयुष्यातील अत्यंत सुखाचे क्षण, आठवणी मिळतात.
कॉलेजमध्ये किंवा त्यानंतर तुमच्या ग्रुपमधील एक मित्र जर अचानक प्रेमात पडला असं कळालं तर सुरुवातीला सगळेजण त्याचं अभिनंदन करतात. पण मग तो व्यस्त होतो, त्याला आपल्यासाठी वेळ मिळत नाही, तो दरवेळी टाळाटाळ करु लागतो...मग आपण म्हणतो हा प्रेमात पडला नसता तर बरं झालं असतं.
अॅडम मिलनर हा त्या मित्रांपैकी एक आहे. तो अचानक प्रेमात पडला आणि त्यानंतर इतका व्यस्त झाला की त्याला मित्रांसाठी वेळच मिळत नव्हता. त्याच्या मित्रांनाही त्याची प्रचंड आठवण येऊ लागली. मग काय त्याच्या आठवणीत या मित्रांनी त्याचं श्राद्धच घालून टाकलं. एखाद्या मित्राची आठवण काढण्याची ही अनोखी पद्धत त्यांनी शोधून काढली आणि सोशल मीडियावर शेअर केली. अॅडमच्या मित्रांनी त्याला गर्लफ्रेंड मिळाल्याच्या दुखात शोकसभाही घेऊन टाकली.
विश्वास पटत नसेल तर हे पहा फोटो आणि व्हिडीओ
अॅडम मिलनरला जेव्हा हे कळलं तेव्हा त्यालाही मित्रांच्या या वागण्याचं आश्चर्य वाटलं आणि हसूही आलं. कार्यक्रमानंतर मित्रांसोबत फोटो काढून तो आपल्याच शोकसभेत सहभागी झाला.