शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

पायऱ्यांपासून बाथरुमपर्यंत केवळ मृतदेहच-मृतदेह...; भयावह होतं दहशतवादी हल्ल्यानंतर मॉस्कोच्या कॉन्सर्ट हॉलचं दृश्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 6:46 PM

मॉस्कोमध्ये शुक्रवारी रात्री उशीरा झालेल्या या हल्लायाने संपूर्ण जगाला हादरा दिला आहे. रशियात 2004 नंतर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि शेकडो लोक रुग्णालयात मृत्यूला झुंज देत आहेत.

रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर क्रोकस हॉलचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. येथे गोळीबाराबरोबरच आग लागल्याने लोकांना बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा इमारतीतच होरपळून मृत्यू झाला. इमारतीच्या वेगवेगळ्या भागांत त्यांचे मृतदेह सापडत आहेत. अगदी बाथरूमपासून ते पायऱ्या आणि कॉरिडोरपर्यंत ठिक-ठिकाणी होरपळलेले मृतदेह सापडत आहेत. या हल्ल्याचा एक नवा व्हिडिओही थरकाप उडवणार आहे. तसेच हल्ल्यानंतरचे फोटोही भयावह आहेत.

मॉस्कोमध्ये शुक्रवारी रात्री उशीरा झालेल्या या हल्लायाने संपूर्ण जगाला हादरा दिला आहे. रशियात 2004 नंतर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि शेकडो लोक रुग्णालयात मृत्यूला झुंज देत आहेत. रशियातील बेसलान शाळेत 2004 मध्ये असाच हल्ला झाला होता. मॉस्कोतील हल्ल्यानंतर शनिवारी मॉस्कोचेगव्हर्नर अँड्रे व्होरोब्योव यांनी घटना स्थळाची पाहणी केली.

चार हल्लोखोरांसह 11 जणांना अटक - रशियन माध्यमांनी हल्लेखोरांचे फोटो जारी केले असून ते परदेशी भाषा बोलत असल्याचा दावा करण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी 5 दिवसांपूर्वीच पाचव्यांदा रशियाची धुरा आपल्या हाती घेतली आहे. यामुळे हा हल्ला त्यांच्या सरकारलाही हादरा देणार आहे. घटनेत्या दुसऱ्या दिवशी रशियन पोलिसांनी चार हल्लेखोरांसह 11 जनांना अटक केल्याचा दावा केला आहे. 

या हल्लेखोरांना यूक्रेन आणि बेलारूसच्या सीमेवर अटक करण्यात आली आहे. हे हल्लेखोर युक्रेन बॉर्डरकडेच पळण्याच्या प्रयत्नात होते. रशियाच्या फेडरल सिक्योरिटी सर्व्हिसनुसार, या हल्लेखोरांचा यूक्रेनसोबत संपर्क होता. दरम्यान, आपला या हल्ल्याशी कसल्याही प्रकारचा संबंध नसल्याचे युक्रेनने निवेदन जारी करून स्पष्ट केले आहे. या हल्ल्यानंतर, आयएसआयएस खुरासानने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.

रशियातील दहशतवादी हल्ले -- 2002 : मॉस्कोच्या दुब्रोवका थिएटरमध्ये 40 ते 50 सशस्त्र चेचेन्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात 170 जण ठार झाले होते.- 2006 : बाजारपेठेत झालेल्या बॉम्बस्फोटात 13 जणांचा मृत्यू.- मार्च 2010 : माॅस्कोच्या मेट्रो स्थानकांत झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 38 जण ठार झाले होते.- ऑक्टोबर 2015 : रशियन विमानात झालेल्या बॉम्बस्फोटात 224 जणांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :russiaरशियाTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादीVladimir Putinव्लादिमीर पुतिनDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल