फरार नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; ब्रिटेनच्या हाटकोर्टाने रद्द केली त्याची याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 04:54 PM2022-11-09T16:54:34+5:302022-11-09T16:56:48+5:30
नीरव मोदीवर 7 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
फरारी हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटनच्या उच्च न्यायालयानेनीरव मोदीची याचिका फेटाळली आहे. कोर्टाने डिसेंबर 2019 मध्ये फरार आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018 नुसार नीरव मोदीला फरार घोषित केले होते. यादरम्यान तो लंडनला पळून गेला. तीन वर्षांपूर्वी त्याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी 13 मार्च 2019 रोजी लंडनमधून अटक केली. त्यानंतर त्याला दक्षिण पश्चिम लंडनमधील वँड्सवर्थ तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर ता नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते. भारत गेल्या अनेक दिवसांपासून नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत होता. पण ही कारवाई टाळण्यासाठी ब्रिटनमध्ये आश्रय घेणारा नीरव मोदी सातत्याने वेगवेगळे तर्कवितर्क देत आलाय. यूके उच्च न्यायालयात, नीरवचे वकील सांगतात की, तो नैराश्यात आहे आणि भारतातील तुरुंगात आत्महत्या करू शकतो. याच तर्काच्या आधारे प्रत्यार्पणाला विरोध केला जात आहे. पण यूके हायकोर्टाने नीरव मोदीची ती याचिका फेटाळली आहे.
नीरव मोदीवर 7 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
नीरव मोदीने PNB मधून सुमारे 7000 कोटींचा घोटाळा केला होता. यानंतर तो परदेशात पळून गेला. तो सध्या लंडनमधील तुरुंगात आहे. त्याला परत आणण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नीरव मोदीने त्याच्या कंपनी फायरस्टार डायमंड्सद्वारे 2017 मध्ये आयकॉनिक रिदम हाऊस इमारत खरेदी केली. त्याचे हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये रूपांतर करण्याची त्यांची योजना होती. पीएनबी घोटाळ्यातून मिळालेल्या पैशातून त्याने बहुतांश मालमत्ता विकत घेतल्याचे समजते.