नवी दिल्ली : आज 13 सप्टेंबरला 13 वर्षांनी असा योग जुळून आला आहे जेव्हा चंद्राचे दुर्मिळ पूर्ण रूप पाहायला मिळणार आहे. याला फुल हार्वेस्ट मून (Full Harvest Moon) असेही म्हणतात. नेहमी चंद्रोदय सूर्यास्तानंतर 50 मिनिटांनी होतो, मात्र आज चंद्रोदय केवळ पाच मिनिटांनी होणार आहे. 'द वॉशिंग्टन पोस्ट'नुसार वॉशिंग्टनमध्ये चंद्र सायंकाळी 7.30 वाजता दिसणार आहे. नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की लोक हा चंद्र पाहू शकतात.
गणपती बाप्पा आणि चंद्राची आख्यायिका आपल्या साऱ्यांनाच माहिती आहे. चतुर्थीच्या दिवशी आपल्याकडे चंद्राचे प्रतिबिंबही पाहत नाहीत. अशुभ मानले जाते. मग पुढारलेल्या अमेरिकन लोकांना फुल हार्वेस्ट मूनची भीती कसली, असा प्रश्न पडला असेल. अमेरिकेच्या संस्कृतीमध्ये फुल हार्वेस्ट मूनला अशुभ मानले जाते. हा दिवसच त्यांच्यासाठी भीतीने ग्रासलेला असतो. हे नाव नेटीव्ह अमेरिकनांनी दिले होते. आज उगवणारा चंद्र नेहमीपेक्षा खूप आधी प्रकाश पसरवतो आणि तो नेहमीच्या पूर्ण चंद्रापेक्षा लहान असतो.
अमेरिकेच्या प्राचीन काळात हा चंद्र उन्हाळ्यातील शेतीला फायद्याचा होता. तोडणीसाठी या प्रकाशाचा वापर केला जात होता. यामुळे त्याचे नाव पश्चिम अमेरिकेत फुल हार्वेस्ट मून असे ठेवण्यात आले होते. या चंद्राला कॉर्न मून म्हणूनही ओळखले जाते. कारण शेतकरी मक्याची कणसे याच प्रकाशात तोडत होते.
नेहमीपेक्षा छोटा दिसणारआजचा चंद्र नेहमीच्या पूर्ण चंद्रापेक्षा छोटा दिसणार आहे. कारण आजचा चंद्र त्याच्या कक्षेच्या दूरच्या टोकाला असणार आहे. यामुळे आजचा चंद्र माइक्रो मून (micromoon) आणि सुपर मून (Super Moons) च्या तुलनेत 14 टक्के लहान आणि 30 टक्के कमी प्रकाशित दिसणार आहे. आजचा चंद्र पृथ्वीपासून 251,655 मैल दूर असणार आहे. हे अंतर माइक्रो मूनपेक्षा 816 मैल दूर असणार आहे. तर सुपर मून मायक्रो मूनपेक्षा 2,039 मैल पृथ्वीच्या जवळ असतो.
900 दशलक्ष डॉलरचे होणार नुकसानउत्तरी कॅरोलिनाच्या स्ट्रेस मॅनेजमेंट आणि फोबिया इन्स्टीट्यूटनुसार अमेरिकेतील 17 ते 21 दशलक्ष लोक या चंद्रापासून घाबरतात. अमेरिकेच्या इतिहासात आजचा दिवस सर्वाधिक भयावह मानला जातो. यामुळे अनेक लोक या दिवशी व्यवहार करणे, विमान प्रवास करणे टाळतात. यामुळे आजच्या दिवशी जगभरात व्यवहार न झाल्याने 800 ते 900 दशलक्ष डॉलरचा व्यापार होत नाही. वैज्ञानिकांनी ही एक खगोलिय घटना असल्याचे म्हटले आहे.