कोरोना व्हायरसने संपूर्ण जगालाच आपल्या कवेत घेतले आहे. आतापर्यंत कोरोनाने (Corona virous) लाखो लोकांचे बळी घेतले आहेत. यामुळे संपूर्ण जगात आजही कोरोनाची दहशत आहे. मात्र, आता कोरोनाची लस बाजारात आल्याने जगभरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जग भरात कोरोना लसीकरणाचे कार्यक्रम सुरू आहेत. यातच कॅनडाचा डान्सर गुरदीप पंधेरने (Gurdeep Pandher) 2 मार्चला कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. यानंतर त्यांनी आपल्या वेगळ्याच अंदाजात याचा आनंद व्यक्त केला आहे. (Funny video Canadian dancer gurdeep did bhangra in the joy of applying covid vaccine)
गुरदीपचा अनोखा अंदाज :सर्वसाधारणपणे लस घेतल्यानंतर लोक आपल्या घरी जाऊन आराम करतात. मात्र, गुरदीपने असे न करता, लस घेतल्यानंतर बर्फ झालेल्या एका तलावावर भांगडा केला. हा भांगडा केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड झाल्यानंतर, गुरदीप यांच्या या अनोख्या अंदाजाला लोकांची जबरदस्त पसंती मिळत आहे.
जेव्हा पॅन्ट-शर्ट अन् बेल्टवर दिसला हत्ती; आनंद महिंद्रांनी नाव दिलं Ele-Pant, लोक म्हणतायत...
व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल - गुरदीपने स्वतःच ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना सांगितले, की लस घेतल्यानंतर तो थेट युकोन येथे गोठलेल्या तलावावर गेला आणि याचा आनंद व्यक्त करण्यासाठी त्याने जबरदस्त भांगडा केला. त्यांच्या या पोस्टमध्ये 55 सेकंदांचा एक व्हिडिओदेखील आहे. या व्हिडिओमध्ये तो गोठलेल्या तलावावर जबरदस्त भांगडा करताना दिसत आहे. तर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये गुरदीपने लिहिले आहे, की काल सायंकाळी मला कोविड-19 लशीचा पहिला डोस मिळाला. यानंतर मी माझा आनंद व्यक्त करण्यासाठी गोठलेल्या तलावावर गेलो आणि तेथे भांगडा केला.
खूशखबर! भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन 81 टक्के परिणामकारक; सीरमच्या लसीला टाकले मागे
गुरदीप यांचा हा व्हिडिओ ट्विटरवर 26 लाख हून अधिक वेळा बघितला गेला आहे. एवढेच नाही, तर सोशल मिडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअरदेखील केला जात आहे. एवढेच नाही, तर लोक त्यांच्या भांगड्याची जबरदस्त तारीफ करतानाही दिसत आहेत.