भारतातील रशियन राजदूत डेनिस अलीपोव्ह यांच्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्या संदर्भात हे वक्तव्य केले आहे. लाव्हरोव्ह हे वुमनायझर (महिलांमध्ये अधिक रूची असणारे व्यक्ती) आहेत. त्यांच्या या वक्तव्यानतंर, त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मात्र, आता अलीपोव्ह यांनी आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त करत रशियन पराराष्ट्रमंत्र्यांची प्रशन्सा केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -फॉरेन करस्पॉन्डन्ट क्लब ऑफ साऊथ आशियामध्ये शुक्रवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान अलीपोव्ह यांना जी20 शिखर परिषदेमध्ये रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन येणार नसल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांना विचारण्यात आले होते की, 'पुतिन रशियन महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. जर ते भारतात आले असते, तर हे आमच्यासाठी खूपच चांगले झाला असते. आम्हाला आनंदच झाला असता. मात्र आता आपले परराष्ट्रमंत्री भारतात येत आहते.
यावर उत्तर देताना अलिपोव्ह म्हणाले, 'रशियन पुरुषांसंदर्भातील आपल्या टिप्पणीसाठी धन्यवाद. तसे तर, लाव्हरोव्ह विवाहीत आहेत. मात्र ते महिलांमध्ये अधिक रूची ठेवणारे व्यक्ती आहेत.'
त्यांच्या या वक्तव्यावर वाद निर्माण झाल्यानंतर, त्यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) स्पष्टीकरण दिले आहे. 'मला खेद वाटतो की माझ्या बोलण्यात काही लोकांबद्दल निंदाजनक भावना होती. मात्र माला केवळ एवढेच म्हणायचे आहे की, लॅव्हरोव्ह हे एक सज्जन व्यक्ती म्हणून महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांची बुद्धिमत्ता, करिष्मा आणि हजरजबावीपणासाठी पुरुषही त्यांची प्रशन्सा करतात.
जी-20 बैठकीत सहभागी होणार नाहीत पुतीन - भारताच्या वतीने नवी दिल्ली येथे 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान G-20 शिखर परिषदेचे आयोजित करण्यात आले आहे. या बैठकीत सदस्य देशांचे जवळपास सर्वच राष्ट्रप्रमुख सहभागी होणार आहेत. मात्र रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन या बैटकीसाठी उपस्थित राहणार नाहीत. यासंदर्भात बोलताना राष्ट्रपती पुतिन यांचे प्रेस सचिव दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले, पुतिन यांच्यासाठी युक्रेनमधील 'विशेष लष्करी कारवाई' हीच सध्या सर्वाधिक महत्त्वाची आहे.