G-20 Summit: इंडोनेशियाची राजधानी बाली येथे G-20 शिखर परिषद पार पडली. या शिखर परिषदेत अनेक देशांचे प्रमुख नेते आले होते. यादरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. याचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे, ज्यामध्ये शी जिनपिंग जस्टिन ट्रुडो यांच्याशी मीडिया लीक प्रकरणावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
संबंधित बातमी- आता G-20 चे अध्यक्षपद भारताकडे; PM मोदी म्हणाले- 'ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट...'
नेमकं काय झालं?द ग्लोब अँड मेलच्या वृत्तानुसार, यावेळी शीन जिनपिंग कॅनडाच्या पंतप्रधानांना म्हणतात की, 'आपली जी काही चर्चा झाली, ती वर्तमानपत्रांमध्ये लीक झाली. हे योग्य नाही. आपण एकमेकांशी आदराने संवाद साधला पाहिजे, अन्यथा परिणाम काय होईल हे सांगणे कठीण आहे.' त्यावर, ट्रूडो म्हणतात की, 'कॅनडाचा मुक्त आणि स्पष्ट संवादावर विश्वास आहे आणि आम्ही ते सुरू ठेवू.' सीटीव्ही न्यूजच्या पत्रकार एनी बर्जेरॉन-ऑलिव्हरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
ही सामान्य घटना नाहीदोन देशांच्या प्रमुखांमध्ये झालेला वाद काही सामान्य घटना नाही. G20 हे एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे आणि येथे जगातील मोठे नेते एकत्र येतात. अशा स्थितीत मंचावर दोन देशांच्या नेत्यांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीने आश्चर्य व्यक्त केले आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शी जिनपिंग यांचा राग स्पष्टपणे दिसत आहे. दुसरीकडे, कॅनडाचे पंतप्रधानही स्पष्टपणे आपले उत्तर देताना दिसत आहेत. या वादानंतर दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करून तेथून काढता पाय घेतला. विशेष म्हणजे, कॅनडाचे पीएम जस्टिन ट्रूडो आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तीन वर्षांनंतर एका व्यासपीठावर भेटले होत.
संबंधित बातमी- प्रेसिडेंड जो बायडन यांचा पीएम नरेंद्र मोदींना सलाम; मोदींनीही हसत-हसत दिले प्रत्युत्तर...
कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?बैठकीत जस्टिन ट्रुडो यांनी चिनी हस्तक्षेपावर सविस्तर चर्चा केली. त्यांनी त्या प्रवृत्तीवर चिंता व्यक्त करत जिनपिंग यांना कारवाई करण्याचे आवाहन केले. याशिवाय रशिया-युक्रेन युद्धावरही दोन्ही नेत्यांनी आपली मते मांडली. आता ज्या काही मुद्द्यांवर चर्चा झाली, ती चीनच्या मते लीक झाली आहेत. कॅनडाने हे मान्य केले नाही, पण ट्रुडो यांनी उघडपणे बोलण्यावर आपला देश विश्वास ठेवत असल्याचे म्हटले आहे.