रशियाच्या जप्त संपत्तीतून युक्रेनला मदत करण्यावर जी-७ राष्ट्रे सहमत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 06:38 AM2024-06-14T06:38:10+5:302024-06-14T06:42:01+5:30
G-7 summit: जी-७ सदस्य देशांनी जप्त केलेल्या रशियन मालमत्तेतून वसूल केलेली ५० अब्ज अमेरिकी डॉलरची मदत युक्रेनला कशी द्यायची यावर सहमती दर्शवली, अशी माहिती संबंधित दोन सूत्रांनी दिली.
ब्रिंडिसी (इटली) - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की हे गुरुवारी इटलीतील जी-७ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय सुरक्षा करारावर स्वाक्षरी करतील. जी-७ सदस्य देशांनी जप्त केलेल्या रशियन मालमत्तेतून वसूल केलेली ५० अब्ज अमेरिकी डॉलरची मदत युक्रेनला कशी द्यायची यावर सहमती दर्शवली, अशी माहिती संबंधित दोन सूत्रांनी दिली.
जी-७ देश युक्रेनला मदत करण्यासाठी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनच्या बाहेर जप्त केलेली रशियाची २६० अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षाही जास्तीची मालमत्ता वापरण्याच्या मार्गांवर चर्चा करत आहेत. या कराराची अद्याप घोषणा झालेली नाही. फ्रान्सच्या राष्ट्रपती कार्यालयाच्या एका अधिकाऱ्याने अशा घोषणेला दुजोरा दिला.
बायडेन-मोदी यांची भेट होण्याची शक्यता
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इटलीमध्ये होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भेट होण्याची शक्यता आहे.
- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांनी बुधवारी ही माहिती दिली आहे.