- निनाद देशमुख- बेंगळुरू : देश विदेशात बँडमिंटनचे कोर्ट गाजवणारी भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने हवाई दलात नव्याने दाखल झालेल्या तेजस या भारतीय बनवितीच्या हलक्या लढाऊ विमानातून आकाशात भरारी घेत संपूर्ण देशातील महिला सैनिकांच्या कार्याचा गौरव केला. तेजस हे अतिशय चांगले विमान असून या विमानामुळे भरती हवाई दलाची ताकद वाढली असल्याचे नमूद करत तिने डीआरडीओ तसेच भारतीय अभियंत्यांचे अभिनंदन केले. बेंगळुरु येथील एलहांका विमानतळावर सुरु असलेल्या १२ व्या 'एअरो ईंडीया २०१९' या प्रदर्शनाचा चौथा दिवस हा भारतीय हवाई दल,सशस्त्र सेना आणि एरोस्पेस क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्याच्या गौरव करण्यासाठी महिला दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त हवाई दलातील काही वैमानिक महिलांनी डॉर्नियर, बी.ए.ई सिस्टम्स पीएलसी चे हॉक-१ एडवांस्ड जेट ट्रेनर या विमानाचे आणि चेतक हेलिकॉप्टर या विमानाचे सारथ्य केले. दरम्यान, पी.व्ही सिंधू ही १२ च्या सुमारास विमानतळावर दाखल झाली. वैमानिकाच्या पोशाख परिधान केल्यावर धावपट्टीवर दाखल झाली. यावेळी तेजसचे वैमानिक विंग कमांडर सिद्धार्थ सिंग यांनी तिचे स्वागत केले. यानंतर १२. १५ ला उड्डाण केले. यावेळी तेजसमधून विविध हवाई कसरतीचा अनुभव सिंधूने घेत विमानाची क्षमता अनुभवली. जवळपास ५ मिनिट विमानाचे नियंत्रणही सिंधूने केले. जवळपास ३० ते ४० मिनिटांची तेजसची सफर सिंधूने अनुभवली. विमानांतून उतरल्यावर पत्रकारांशी सिंधूने संवाद साधला. सिंधू म्हणाली, तेजस हे विमान अतिशय चांगले आहे. या विमानातील उडण्याचा अनुभव रोमांचकारी होता. विमानात बसण्यापूर्वी थोडे दडपण होते मात्र, उड्डाणानंतर थोड्या वेळात विमानातील वातावरणाशी जुळवून घेतले. तेजस हे अतिशय चांगले विमान आहे. भारतीय अभियंते आणि डीआरडीओ चे शास्त्रज्ञ याचे कौतुक असून मला मिळालेल्या संधी बद्दल मी त्यांचे आभार मानते. सशस्त्र दलातील महिलांचे काम हे आव्हानात्मक आहे. भारतीय सैन्य दलात महिलांना मोठ्या संधी आहेत. याचा फायदा घेत सैन्य दलात महिलांनी सहभागी होण्याचे आवाहनाही तिने केले. ............................१२ व्या 'एअरो ईंडीया २०१९' या प्रदर्शनाचा चौथा दिवस हा भारतीय हवाई दल,सशस्त्र सेना आणि एरोस्पेस क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्याच्या गौरव करण्यासाठी महिला दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी हवाई दलातील अनेक महिला यावेळी उपस्थित होत्या. दुपारी अनेक विमानाच्या पथकाचे सारथ्य करत महिलांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. हक विमानाचे सारथ्य फ्लाईट लेफ्टनंट मोहना सिंग यांनी केले. डॉर्नियर विमानाचे सारथ्य स्कार्ड्न लीडर राखी भंडारी यांनी केले. स्क्वार्ड्न लीडर कमलजीत कौर आणि प्लाईट लेप्टनंट सिधु यांनी चेतक हेलिकॉप्टर चे सारथ्य करत महिलांच्या कार्याचा गौरव केला. ...................१० हजार फुटांवरून तिरंग्यासह महिला प्याराजम्पर्सननी मारल्या उड्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्यारा जम्पर्स च्या एका तुकडीने एम १७ या हेलिकॉप्टर मधून भारतीय तिरंग्यासह जवळपास १० हजार फुटांवरून उद्या मारल्या. यात ६ महिला अधिकारी तर ६ पुरुष अधिकारी होते. विंग कमांडर आशा जोतिर्मय हिने या पथकाचे नेतृत्व केले. ..................हिंदुस्थान एरोनॉटीकल लिमीटेड कंपनीद्वारे बनवण्यात आलेलं तेजस विमान नुकतच सर्व सोपस्कार पार पाडून हवाई दलाच्या खात्यात सहभागी झाले आहे. या विमानामुळे हवाई दलाच्या ताकदीत अजुन भर पडणार असल्याचं मत अनेक संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. काही दिवसांपूर्वी भारताचे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनीही तेजस विमानातून उड्डाण केलं होते.
बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूची ‘तेजस’ मधून गगन भरारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 3:40 PM
तेजस हे विमान अतिशय चांगले आहे. या विमानातील उडण्याचा अनुभव रोमांचकारी होता...सशस्त्र दलातील महिलांचे काम हे आव्हानात्मक आहे : बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधू.
ठळक मुद्देभारतीय बनावटीच्या विमानातून उड्डाण करणारी पहिली क्रीडापटू मिथिला सैनिकाच्या कार्याचा गौरव भारतीय हवाई दल,सशस्त्र सेना आणि एरोस्पेस क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्याच्या गौरव सशस्त्र दलातील महिलांचे काम हे आव्हानात्मक १० हजार फुटांवरून तिरंग्यासह महिला प्याराजम्पर्सननी मारल्या उड्या