काबुल - तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतर आणि राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडून पळ काढल्यानंतर, विविध प्रकारचे कयास लावले जात आहेत. दरम्यान, अमेरिका आपले आणखी 1000 सैनिकअफगाणिस्तानात पाठवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातच, जागतिक स्तरावर टीकेचे लक्ष बनलेले अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन आज रात्री उशिरा अफगानिस्तान-तालिबान मुद्यावर निवेदन देणार आहेत. (The game in Afghanistan is over, or something else, America taken big decision!)
दुसरीकडे, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझई आणि तालिबानसोबत शांततेसंदर्भात चर्चा करणाऱ्या गटाचे प्रमुख अब्दुला-अब्दुल्ला हेही सातत्याने तालिबानच्या संपर्कात आहेत. अफगाणिस्तानातील लोकशाही सरकारशी संबंधित असलेले हे दोन्ही नेते काबूलमध्ये आहेत. अशी स्थिती असताना, आता अफगाणिस्तानात नेमके काय होणार? असा प्रश्न उपस्थित केले जात आहे.
Afghanistan Crisis: तालिबान सरकारसोबत मैत्रीसाठी चीन तैय्यार, या 4 देशांचं समर्थन मिळणार
अमेरिका 1000 अतिरिक्त सैनिक पाठवणार - अफगाणिस्तानातून आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर, आता अमेरिका कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, की "जर कोणत्याही कारवाईमुळे आमच्या मिशनला अथवा आमच्या जवानांना हानी पोहोचली, तर आम्ही त्वरित आणि प्रभावी लष्करी कारवाई करू," असे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेने आणखी 1000 सैनिक अफगाणिस्तानात पाठवण्याची तयारी केली आहे. तर, सुमारे 5000 अमेरिकन सैनिक आधीच अफगाणिस्तानमध्ये तैनात आहेत. तसेच, अमेरिकन सैन्यातील एक वरिष्ठ कमांडर आज दोहा येथे तालिबानच्या नेत्यांना भेटले.
'भारत भूमिका बदलेल आणि आमची साथ देईल अशी आशा', तालिबान प्रवक्त्याचं मोठं विधान
अफगानिस्तानच्या मुद्द्यावर बायडेन देणार निवेदन - अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरून ज्यो बायडेन यांना लक्ष केले जात आहे. ते आज अफगाणिस्तानच्या ताज्या परिस्थितीवर निवेदन देत आहेत. तसेच, ते अफगानिस्तानसंदर्भात अमेरिकेच्या भविष्यातील धोरणांसंदर्भातही भाष्य करतील, असा कयास लावला जात आहे. आजच्या पत्रकार परिषदेत तालिबानचा कट्टार शत्रू असलेली अमेरिका, त्यांच्या शासनाला मान्यता देणार की नाही, हे पाहणे महत्वाचे आहे. एवढेच नाही, तर सध्या अफगाणिस्तानात असलेले अमेरिक सैनिक आता कुठले मिशण पार पाडणार, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.