गाझा/जेरुसलेम : लढाई काही काळ थांबविण्याची संयुक्त राष्ट्राची विनंती इस्नयल आणि हमासने मान्य केल्यानंतर गाझापट्टीत शनिवारी 12 तासांची मानवीय शस्त्रसंधी सुरू झाली. तथापी, 19 दिवसांच्या संघर्षात 884 पॅलेस्टिनी आणि 38 इस्नयलींचा बळी गेल्यानंतरही शस्त्रसंधी अद्याप दृष्टिक्षेपात नाही.
शनिवारी 12 तासांच्या शस्त्रसंधीसाठी राष्ट्रीय सहमती झाली, असे हमासचा प्रवक्ता समी अबू झुहरी याने शुक्रवारी रात्री सांगितले होते. इस्नयली लष्कराने नंतर शस्त्रसंधी मान्य असल्यास दुजोरा देतानाच या दरम्यान हमासचे बोगदे हुडकून ते नष्ट करणार असल्याचे स्पष्ट केले होते. दहशतवाद्यांनी इस्नयली सुरक्षा दले किंवा नागरिकांवर हल्ले करण्यासाठी शस्त्रसंधीच्या काळाचा दुरुपयोग केल्यास आम्ही प्रत्युत्तर देऊ, असे इस्नयली लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, गाझातील पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रलयाने आतार्पयतच्या संघर्षादरम्यान 884 जण मारले गेल्याचे आणि त्यातील बहुतांश सामान्य नागरिक असल्याचे म्हटले आहे. गाझातील संघर्षात दोन इस्नयली सैनिकही मारले गेले. (वृत्तसंस्था)
एका बालिकेने जगात पाऊल ठेवलेले नसताना तिच्या आईने जगाचा निरोप घेतला. ही कहाणी आहे इस्नयलच्या गाझातील हल्ल्याची. शुक्रवारी सकाळी झालेल्या हवाई हल्ल्यात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. तेव्हा तिच्या प्रसूतीस अवघ्या दोन आठवडय़ांचा कालावधी उरला होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे तिच्या उदरातील बाळ वाचविले. गाझातील एका रुग्णालयात दाखल या मुलीला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून ती वाचण्याची 5क् टक्के शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ही महिला अन्य कुटुंबांसोबत एका इमारतीत राहत होती. इस्नयली हल्ल्यात ही इमारत जमीनदोस्त झाली. गर्भवती महिला ढिगा:याखाली दबून मृत्युमुखी पडली होती.
संयुक्त राष्ट्रातर्फे चालविण्यात येणा:या शाळेवरही गुरुवारी हवाई हल्ला झाला होता.