बर्लिन : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या व्हायरसने आजपर्यंत जगभरात हजारो लोकांचा जीव घेतला आहे. तर लाखो लोकांना या व्हायरसची लागण झाली आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जर्मनीने देशात घातलेले निर्बंध अधिक कठोर केले आहेत.
या महामारीला रोखण्यासाठी जर्मनीने 2 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित बसण्यावर बंधन घातले आहे. बीबीसीने रविवारी जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्केल यांच्या हवाल्याने म्हटले आहे, की 'आपला व्यवहारच संक्रमण रोखण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे. जर्मनिने घातलेल्या नव्या प्रतिबंधात ब्यूटी-पार्लर, मसाज पार्लर आदी बंद राहतील, या शिवाय इतर काही आवश्यकता नसणारी दुकाने यापूर्वीच बंद करण्यात आली आहेत.
मर्केल यांच्या संबोधनानंतर, काही वेळातच त्या स्वतःच एकांतवासात जाणार आहेत. त्या शुक्रवारी एका डॉक्टरच्या संपर्कात आल्या होत्या. त्यांना अॅन्टी निमोनियाचे इंजग्शन देणाऱ्या डॉक्टरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे त्यांनी एकांतवासात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले.
जर्मनीत आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू -एकांतवासात गेल्यानंतर मर्केल यांची पुढील काही दिवस नियमितपणे तपासणी करण्यात येईल. या काळात त्या घरूनच सर्व कामे करतील. युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था मानल्या जाणाऱ्या जर्मनीमध्ये आतापर्यंत 18,610 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 55 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे.
दोन आठवडे लागू राहणार हा नियम -जर्मनीने घातलेल्या या नव्या नियमांनुसार आता येथे तीन अथवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. हा नियम एकाच घरात सोबत राहणाऱ्या आणि कामाच्या ठिकाणी हा नियम लागू नसेल. या नियमानुसार पोलीस सर्वांवर लक्ष ठेवणार असून नियमाचे उलंघण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. साधारणपमे दोन आठवड्यांपर्यंत हा नियम असाच लागू राहणार असल्याचे बोलले जात आहे.
188 देश कोरोनाच्या कवेत -एकवीसाव्या शतकामध्ये जग एका भयानक संकटातून जात आहे. कोरोनाने जगभरातील १८८ देशांना कवेत घेतले असून मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३.५ लाखांवर गेला असून 15,408 जणांचा मृत्यू झाला आहे.
सर्वाधिक मृतांची संख्या इटलीमध्येएकट्या इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यूंची संख्या ५ हजारावर जाऊन पोहोचली आहे. महत्वाचे म्हणजे ज्या चीनमध्ये या व्हायरसचा जन्म झाला तिथे केवळ सव्वा तीन हजार लोकांचाच मृत्यू झाला आहे.