बर्लिन : इसिसविरुद्ध लढाईसाठी जर्मनीने फ्रान्सला मदतीचा हात देऊ केला आहे. जर्मनीचे संरक्षणमंत्री उर्सूला वोन डेर लेयेन यांनी मदतीची ही घोषणा केली आहे. दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्रपती ओलांद यांनी या प्रस्तावाबद्दल जर्मनीचे आभार मानले आहेत. या मदतीअंतर्गत जर्मनी फ्रान्सला लढाऊ विमान, सैन्य, हवेतच इंधन भरण्याची सुविधा आणि उपग्रहांद्वारे छायाचित्र उपलब्ध करून देणार आहे. जर्मनीचे संरक्षणमंत्री लेयेन यांनी म्हटले आहे की, अतिरेकी हल्ल्यामुळे फ्रान्सला मोठा आघात सहन करावा लागला आहे; मात्र आम्ही हे जाणून आहोत की, असा हल्ला आम्हाला किंवा अन्य समाजाला लक्ष्य करू शकतो. जर्मनीने दिलेल्या या प्रस्तावाला चॅन्सलर एंजेला मर्केल यांच्या कॅबिनेटची मंजुरी आवश्यक आहे. मर्केल यांच्या आघाडीकडे पूर्ण बहुमत आहे. फ्रान्स, रशिया समन्वय ठेवणारमॉस्को : रशिया आणि फ्रान्सने इस्लामिक स्टेटच्या (इसिस) जिहादींविरुद्ध समन्वयाने हल्ले करण्यास सहमती दर्शविली. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबतच्या चर्चेनंतर उभय देश समन्वयाने हल्ले करण्यास राजी झाले, असे फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
इसिसविरोधी लढाईसाठी जर्मनीचा मदतीचा हात
By admin | Published: November 28, 2015 12:13 AM