शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
3
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
4
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
5
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
6
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
7
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
8
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग
9
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
10
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
11
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
12
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
13
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
14
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
15
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
16
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
17
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
18
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
19
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 
20
'RBI ने व्याजदर कमी करावेत' गोयल यांच्या मागणीवर गव्हर्नर दास यांचं एका वाक्यात उत्तर

नव-याला परत मिळवण्यासाठी 'तिने' पोटच्या मुलीवर केला विषप्रयोग

By admin | Published: August 07, 2016 12:12 PM

सोडून गेलेल्या नव-याला परत मिळवण्यासाठी एका निदर्यी महिलेने आपल्या १७ महिन्यांच्या मुलीवर मीठाचा विषप्रयोग केला.

ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. ७ - सोडून गेलेल्या नव-याला परत मिळवण्यासाठी एका निदर्यी महिलेने आपल्या १७ महिन्यांच्या मुलीवर मीठाचा विषप्रयोग केला. ज्यामध्ये मुलीचा मृत्यू झाला. अमेरिकेतील स्पारटानबर्ग शहरात ही घटना घडली. किमबर्ली मार्टीन्स असे आरोपी महिलेचे नाव आहे. 
 
तिने पीयटॉन या आपल्या १७ महिन्याच्या मुलीवर मीठाचा विषप्रयोग केला. किमबर्लीला सोडून गेलेल्या नव-याला कुठल्याही परिस्थिती आपल्या आयुष्यात परत आणायचे होते. त्यासाठी तिने नव-याचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे कृत्य केले. ज्यामध्ये निष्पाप १७ महिन्यांच्या मुलीला आपल्या प्राणास मुकावे लागले. 
 
किमबर्लीने पीयटॉनला चमच्याने मीठ भरवले त्यानंतर तिला पेय पाजले. पीयटॉनच्या रडण्याच्या आवाजाने मला रविवारी जाग आली. ती तापाने फणफणत होती. तिला लगेच रुग्णालयात दाखल केले असे किमबर्लीने पोलिसांना सांगितले. पीयटॉन उपचारांना प्रतिसाद देत नव्हती. 
डॉक्टरांनी तिला लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवले होते. अखेर बुधवारी तिचा मृत्यू झाला. किमबर्लीची बहिण टीफअॅनी लिझरने किमबर्लीवरचे आरोप फेटाळून लावले. किमबर्ली असे कधी करु शकत नाही. ती अत्यंत चांगली आई आहे असे तिने सांगितले. गुन्हा सिद्ध झाल्यास किमबर्लीला २० वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.