जेरूसलेम : पॅलेस्टीनमधील अल कुदस् या प्रतिष्ठित विद्यापीठाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी भारताकडून संगणक भेट देणार असून त्यासोबतच्या चार दूरसंचार प्रणालींना मात्र इस्रायल सरकार परवानगी देण्याची शक्यता नसल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मुखर्जी यांच्या हस्ते मंगळवारी या विद्यापीठात अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञान केंद्राचे उद््घाटन होणार आहे. या चार प्रणाली या केंद्राच्या अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. मुखर्जी यांना हे विद्यापीठ मानद डॉक्टरेट बहाल करणार आहे.इस्रायलच्या कस्टम्स विभागाने ३० संगणक घेऊन जाण्यास परवानगी दिली तरी त्यासोबतची दूरसंचार यंत्रणा (यात सॅटेलाईट फोनही आहेत) घेऊन जाण्यास परवानगी दिलेली नाही. इस्रायलच्या कायद्यानुसार दूरसंचार प्रणालीला घेऊन जाण्यास परवानगी नाही, असे सांगून इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. मुखर्जी अल अक्सा मशिदीला भेट देणार असल्याबद्दल इस्रायलने आक्षेप घेतल्यानंतर हा नवा वाद निर्माण झाला आहे. (वृत्तसंस्था)
भारताची ‘भेट’ रोखली
By admin | Published: October 12, 2015 10:33 PM