लाहोर: गेल्या वीस वर्षांतील पाकिस्तानच्या पंतप्रधान, राष्ट्राध्यक्षांनी त्यांना विविध विदेश दौरे तसेच व्यक्ती, संस्थांनी दिलेल्या मौल्यवान भेटवस्तू मूळ किमतीपेक्षा खूप कमी पैशांत स्वत:च्या पदरात पाडून घेतल्या. हे गैरव्यवहार करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ, शाहीद खाकान अब्बासी, इम्रान खान तसेच राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ, असिफ अली झरदारी, आदींचा समावेश आहे.
पंतप्रधान, राष्ट्राध्यक्षांना मिळालेल्या भेटवस्तू तोशखानात (राष्ट्रीय कोषागार) जमा करण्यात येतात. २००२ ते २०२३ या कालावधीत अशा किती भेटवस्तू जमा झाल्या व त्यातील किती वस्तू नंतर विकण्यात आल्या याचा तपशील पाकिस्तान सरकारने नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यातील माहितीमुळे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांनी भेटवस्तूंबाबत केलेले गैरव्यवहार उजेडात आले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू काही लाख रुपयांत आपल्या पदरात पाडून घेण्यात इम्रान खान, शरीफ कुटुंबीय आघाडीवर आहेत.
सोन्याची एके- ४७ रायफल
इम्रान खान यांना सौदी अरेबियाच्या दौऱ्यात सोन्याची एके-४७ रायफल मिळाली होती. त्यांना अन्य दौऱ्यांमध्ये त्यांना ८.५ कोटी रुपयांचे सोन्याचे घड्याळ, १५ लाख रुपयांचे पेन, ८५ लाख रुपयांची अंगठी मिळाली होती.
घड्याळ विकून कमवला नफा?
राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांना एक सवलत देण्यात आली होती. ती म्हणजे ३० हजार रुपयांपर्यंतच्या भेटवस्तू ते स्वत:कडे ठेवू शकतात. त्यापेक्षा महागडी वस्तू असल्यास तिच्या किमतीच्या विशिष्ट प्रमाणात पैसे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष सरकारी तिजोरीत जमा करून ती वस्तू आपल्याकडे ठेवू शकतात. इम्रान खान यांना भेटस्वरूपात मिळालेले ८० लाख रुपयांचे घड्याळ त्यांनी तोशखान्यातून अगदी कमी किमतीला खरेदी केले. तेच घड्याळ पुन्हा जास्त किमतीला विकून त्यातून नफा कमावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी इम्रान खान यांच्यावर न्यायालयात खटला सुरू आहे.
भेटवस्तूंवर कोणी मारला सर्वाधिक डल्ला?
नाव-पद भेटवस्तूंची संख्याअसिफ अली झरदारी १८०माजी राष्ट्राध्यक्ष नवाज शरीफ ५५माजी पंतप्रधानशाहीद खाकान अब्बासी २७माजी पंतप्रधानइम्रान खान ११२माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ १२६माजी राष्ट्राध्यक्ष
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"