शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

गिलगिट आणि बाल्टिस्तान हा भारताचा भाग, ब्रिटननं पाकिस्तानला फटकारलं

By admin | Published: March 26, 2017 2:27 PM

गिलगिट आणि बाल्टिस्तान हा भारतातल्या जम्मू-काश्मीरचाच भाग आहे

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 26 - गिलगिट आणि बाल्टिस्तान हा भारतातल्या जम्मू-काश्मीरचाच भाग आहे. या भागावर पाकिस्तानने केलेला कब्जा अवैध असल्याचा दावा ब्रिटनने केला आहे. गिलगिट आणि बाल्टिस्तान हे दोन्ही भूभाग भारताचेच आहेत. पाकिस्तानने तेथे बळजबरीनं ताबा मिळवल्याचं ब्रिटनने म्हटले आहे. ब्रिटनच्या संसदेमध्ये गिलगिट आणि बाल्टिस्तान हा भारतातच भाग असल्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरच्या भारताच्या दाव्यांना अधिक ताकद मिळाली आहे.ब्रिटनच्या संसदेमध्ये मंजूर झालेल्या ठरावानुसार काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्टिस्तान या भागांवर भारताचा दावा असून, पाकिस्ताननं या भूभागांवर अवैध कब्जा केल्याचं या ठरावात म्हटलं आहे.तसेच पाकिस्तानकडून पाचवा प्रांत म्हणून गिलगिट आणि बाल्टिस्तानवरचा दावा खोडून काढत ब्रिटनने पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. गिलगिट आणि पाकिस्तान हा भारतातील जम्मू-काश्मीरचा कायदेशीर आणि घटनात्मक भाग आहे, असेही संसदेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावात स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. ब्रिटन संसदेत मंजूर झालेल्या या प्रस्तावामुळे भारताच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. तसेच पाकिस्तानला यामुळे चांगलीच चपराक बसल्याची चर्चा आहे. गिलगिट-बाल्टिस्तानवर भारताचा दावा असल्याचा प्रस्ताव ब्रिटनच्या संसदेमध्ये 23 मार्च रोजी मांडण्यात आला होता. त्यानंतर या प्रस्तावावर सभागृहात कंझर्वेटिव्ह पक्षाचे नेते बॉब ब्लॅकमेन यांनी भारताची बाजू घेत 1947च्या दरम्यानच पाकिस्तानने या भागावर अवैधरीत्या कब्जा केल्याची माहिती सभागृह सदस्यांना दिली. चर्चेनंतर या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आणि पाकिस्तानच्या कृतीचा सभागृहाने निषेधही केला. त्याचबरोबर या भागात पाकिस्तान आणि चीनच्या सहकार्याने सुरू असलेले चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पाचेही कामही गैर असल्याचे ब्रिटनने स्पष्ट केले आहे. त्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट आणि बाल्टिस्तान दाव्यावर टीका केली आहे. पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट आणि बाल्टिस्तान या भागांवर पाकनं मिळवलेला ताबा हा बेकायदा आहे. तो भाग आधी मुक्त करून काश्मीरला त्याच्या मूळ स्वरूपात आणू, असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केलं आहे. काश्मीरची समस्या पाकनेच निर्माण केली असून, चीनच्या जिवावर पाकचे नेते बेताल वक्तव्ये करीत सुटले आहेत. पाकने पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट आणि बाल्टिस्तान या काश्मीर राज्यांच्या भागांवर बेकायदेशीर ताबा मिळवला असून, जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार माजविणा-या फुटीरतावाद्यांना पाकनेच गेली अनेक दशके खतपाणी घातले आहे. पाकच्या तावडीतून आम्ही संपूर्ण काश्मीरची मुक्तता करणार असून, या भागाचा भारतात पुन्हा समावेश करणार आहोत, असंही जितेंद्र सिंग म्हणाले आहेत.