सापासोबत खेळणं किती महागात पडू शकतं याचं उदाहरण असलेली एक घटना समोर आली आहे. रशियात एक मुलगी प्राणी संग्रहालयात गेली होती. हे एक असं प्राणी संग्रहालय होतं, जिथे शिकारी प्राण्यांना पाळिव बनवण्यात आलं आहे. लोक इथे येतात आणि त्यांच्यासोबत खेळतात. याचं नाव Butterflies Park Petting zoo आहे. इथे ही मुलगी एका विषारी सापासोबत खेळू लागली होती. अशात सापाने तिला दंश मारला आणि मुलीचा मृत्यू झाला.
गळ्यात घालून फिरत होती साप
न्यूयॉर्क पोस्टनुसार, व्हिक्टोरियाने rufous beaked सापाला आपल्या गळ्याभोवती गुंडाळलं होतं. सापाला गळ्यात गुंडाळून ती इकडे-तिकडे फिरत होती. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. खेळता खेळता सापाने अचानक मुलीच्या चेहऱ्यावर दंश मारला. (हे पण वाचा : BF सोबत पिकनिकला गेली युवती, ह्द्रयद्रावक घटनेत झाला मृत्यू; प्रियकरानं वाचवला स्वत:चा जीव)
जेव्हा सापाने मुलीच्या चेहऱ्यावर दंश मारला तेव्हा स्टाफ मेंबर्सनी लगेच सापाला तिच्यापासून दूर केलं. या सापामध्ये जास्त विष नसतं. हा माइल्ड विष असलेला साप असतो. सापाची ही प्रजाती पूर्व आफ्रिकेत आढळून येते. मुलीला नंतर लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तिचा मृत्यू झाला.
रात्री खाल्लं होतं चिकन
प्राणी संग्रहालयाच्या स्टाफ मेंबर्सने सांगितलं की, आधी कोणत्याही सापाने कुणावर अशाप्रकारे अटॅक केला नव्हता. पण एक्सपर्ट असं सांगत आहेत की, हे सगळं मुलीच्या पोटातून येत असलेल्या वासामुळे झालं असावं. कारण व्हिक्टोरियाने रात्री चिकन खाल्लं होतं. सापांना कशाचाही गंध लवकर येतो. सापांचे एक्सपर्ट Ekaterina Uvarova ने सांगितलं की, हा गंधही सापाने अटॅक करण्याचं एक कारण असू शकतो. इतकंच नाही तर त्यांनी सांगितलं की, अनेक सापांनाही स्ट्रेस येतो त्यामुळेही ते अटॅक करतात.