लंडन : आईला आपल्या मुलीचे सायनाईड (विष)असे नाव ठेवता येणार नाही, असा निकाल ब्रिटनमधील न्यायालयाने दिला. आईच्या नावाच्या निवडीमुळे मुलीचे नुकसान होऊ शकते असे सांगत न्यायालयाने मुलीचे खतरनाक नाव ठेवणे मान्य नसल्याचे स्पष्ट केले. आईने या मुलीच्या जुळ्या भावाचे नाव प्रेचर (धर्मोपदेशक) ठेवले आहे. आपल्या मुलांची नावे ठेवण्याचा आपल्याला अधिकार आहे, असा युक्तिवाद या महिलेने केला. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला. या प्रकरणाचा निकाल देताना, मानसिक आजार, मद्य, अमली पदार्थांचे व्यसन तसेच शिवीगाळ करणाऱ्या पुरुषाशी नातेसंबंध अशी या महिलेची पार्श्वभूमी असल्याचे न्यायाधीशांनी नमूद केले. या महिलेला दुसऱ्या पुरुषापासून झालेली दोन अपत्ये आता दत्तक पालकांसोबत राहत आहेत. या महिलेने आपल्या मुलीसाठी निवडलेले नाव ऐकून सामाजिक कार्यकर्त्यांनी हे प्रकरण न्यायालयात नेले होते. त्यावर सुनावणीअंती मुलीचे सायनाईड नाव ठेवण्यास मज्जाव करण्यात आला.
आईला मुलीचे नाव ‘सायनाईड’ ठेवता येणार नाही - कोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2016 3:15 AM