मैत्रिणीच्या घरी आल्यावर आपण कारमध्येच आपली अगदी छोटी मुलगी विसरलो ही मोठीच चूक झाल्याची भावना आईने फेसबुकवरील पोस्टमध्ये व्यक्त केली आहे. तब्बल २० मिनिटे ही मुलगी कारमध्ये रडत होती. सुदैवाने तिला काही इजा झाली नाही. कारमध्ये तापमान वाढले असते व बाहेर कडक उन्हाळा असता तर बाळाला काहीही होऊ शकले असते. जे लोक आम्ही कधीही अशा प्रकारची चूक करीत नाहीत असा समज असलेल्या लोकांसाठी मी ही माझी चूक फेसबुकवर शेअर केली, असे या विसराळू आईने म्हटले. रडून-रडून थकल्यानंतर गाढ झोपलेल्या आपल्या मुलीचे छायाचित्रही या आईने फेसबुकवर अपलोड केले. तिने हे कसे घडले ते लिहिले. ‘‘मैत्रिणीच्या घरी आल्याच्या उत्साहात आम्ही कारमधून बाहेर आलो व छोट्या मुलीला दुसरे कोणी तरी घेऊन येईल, असा समज झाला. परंतु तसे झाले नाही. म्हटले तर ही छोटीशी चूक परंतु तिचे परिणाम गंभीर झाले असते. ‘देवाचे आभार की आम्ही सुरक्षित जागी कार उभी केली होती. देवाचे आभार की बाहेर कडक ऊन नव्हते. देवाचे आभार की तिला फार वेळ एकटी राहावे लागले नाही. देवाचे आभार की ती हे सगळे आधीच विसरली असून तिने आम्हाला क्षमाही केली आहे. परंतु मी स्वत:ला क्षमा करायला खूप काळ जावा लागेल.’’
मुलीने मला क्षमा केली, पण मी स्वत:ला करून शकेन?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2017 12:00 AM