ऑनलाइन लोकमत -
पॅरिस (फ्रान्स), दि. 12 - ट्रेनसमोर उडी मारत 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे आत्महत्या करण्याआधी तरुणीने पेरिस्कोप या अॅप्लिकेशनद्वारे आपल्या आत्महत्येचं लाईव्ह रेकॉर्डिंगही केलं. पॅरिसमध्ये ही घटना घडली आहे. पेरिस्कोप हे स्मार्टफोनमधील एक अॅप्लिकेशन आहे ज्याद्वारे युझर्स ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग करु शकतात. 24 तासांसाठी हा व्हिडिओ उपलब्ध असतो.
या तरुणीने आत्महत्या करण्याआधी आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. तसंच आत्महत्येसाठी जबाबदार असणा-या व्यक्तीचं नावही घेतलं असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला असून यातील सत्यता बारकाईने पडताळली जात आहे.
मंगळवारी एगली या परिसरात ही आत्महत्या करण्यात आली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. फोनची आणि आत्महत्येपुर्वी रेकॉर्ड करण्यात आलेल्या व्हिडिओची पोलीस तपासणी करत आहेत. पेरिस्कोपवर हे लाईव्ह स्ट्रिम सुरु असताना एका व्यक्तीने हे पाहिल्यानंतर पोलिसांना कळवलं.