वॉशिंग्टन : हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणाऱ्या बालकांना साठवून ठेवलेले रक्त देण्याऐवजी एकाच दात्याचे ताजे रक्त दिल्यास त्यांचा रक्त देण्याशी संबंधित व्याधी जडण्याचा धोका कमी होऊ शकतो, असे एका नव्या अभ्यासात आढळून आले आहे. या अभ्यासानुसार, रक्त किंवा रक्तघटक स्वीकारणाऱ्या रुग्णांना विशेष करून बालकांना अॅलर्जी व फुप्फुसाशी संबंधित संसर्गजन्य रोगासारखे गंभीर आजार जडण्याचा धोका अधिक असतो. दोन वर्षे किंवा त्याहून छोट्या मुलांना इलेक्टिव कार्डियाक शस्त्रक्रियेसाठी दोन युनिट ताजे संपूर्ण रक्त देण्याची प्रक्रिया करताना संसर्ग कमी करणे हा जॉब्स व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अभ्यासाचा उद्देश होता. अभ्यासानुसार, ताजे संपूर्ण रक्त असावे, रक्तातील घटकांना (लाल पेशी, प्लेटलेट्स, प्लाज्मा) वेगळे केलेले नसावे आणि हे रक्त शस्त्रक्रियेच्या आधी ४८ तासांहून कमी वेळेत घेतलेले असावे. असे रक्त दिले गेल्यास संसर्गाचा धोका कमी असतो. हे संशोधन द एनल्स आॅफ थोरेसिस सर्जरी या नियतकालिकात प्रसिद्ध झाले होते. (वृत्तसंस्था)
ताजे रक्त दिल्यामुळे संसर्गाचा धोका घटतो
By admin | Published: May 02, 2015 11:08 PM