शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

मित्रासोबत मिळून महिलेने बॅंकेत केला मोठा घोटाळा, तिजोरीत कागद भरून कोट्यवधी रूपये घेऊन फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 3:25 PM

Crime News : इथे एका सुंदर महिलेने तिच्या साथीदारासोबत मिळून त्या बॅंकेट लूट केली जिथे ती अनेक वर्षांपासून काम करत होती. ती तिथे केवळ काम तर करतच होती, पण सोबतच बॅंकेच्या मालकांपैकी एक होती.

Russia : जगभरात रोज फसवणुकीच्या, लुटीच्या वेगवेगळ्या घटना समोर येत असतात. छोटे-मोठे चोर काही रूपयांची हेराफेरी करून शांत बसतात. पण काही ठग हे मोठा कारनामा करतात. चार वर्षाआधी रशियातून लुटीची एक अशीच धक्कादायक घटना समोर आली होती. इथे एका सुंदर महिलेने तिच्या साथीदारासोबत मिळून त्या बॅंकेट लूट केली जिथे ती अनेक वर्षांपासून काम करत होती. ती तिथे केवळ काम तर करतच होती, पण सोबतच बॅंकेच्या मालकांपैकी एक होती. तिचा साथीदारही याच बॅंकेच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सपैकी एक होता.

इनेसा ब्रांडेनबुर्ग (Inessa Brandenburg) हे नाव ठगांच्या लिस्टमध्ये खूप वर येतं. तिने बॅंकेतून साधारण 67 कोटी 49 लाख रूपये लंपास केले होते आणि त्याजागी कागदांचे तुकडे तिजोरीत ठेवले होते. ही चोरी समोर येईपर्यंत इनेसा प्रायव्हेट जेटने देशाबाहेर गेली होती. अनेक वर्षांपासून तिचा शोध घेतला जात होता. ज्यानंतर गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये तिला स्पेनमध्ये पकडण्यात आलं. आता तिला परत रशियात सुनावणीसाठी आणलं जात आहे.

इनेसाने जानेवारी 2018 मध्ये ही चोरी केली होती. तिने ट्यूमेनच्या सायबेरियन बॅंक ऑफ रिकंस्ट्रक्शन अॅन्ड डेव्हलपमेंटमधून पैसे चोरी केले होते. त्यानंतर ती देश सोडून फरार झाली होती. बॅंकेच्या क्लार्कला तिजोरीत पैशांच्या जागी कागदांचे तुकडे दिसले. त्यानंतर लगेच तपास सुरू केला गेला आणि समोर आलं की, इनेसाने सगळे पैसे लंपास करून त्याजागी कागदांचे तुकडे ठेवले होते. पैसे स्पोर्ट्स बॅगमध्ये भरून ती बॅंकेतून गेली होती. हे सगळं समजण्याआधीच इनेसा प्रायव्हेट जेटने देशातून बाहेर गेली होती. तिला चार वर्षांपासून शोधलं जात होतं.

इनेसा या चोरीमध्ये एकटी नव्हती. या चोरीत तिच्यासोबत याच बॅंकेतील को-ओनर आणि बोर्ड चेअरमॅन रोमान्यता सहभागी होता. इनेसाची बॅंकेत जी पोस्ट होती, त्याच मदतीने  तिने एक्स्ट्रा कॅश सप्लाय करण्याची रिक्वेस्ट टाकली होती. इनेसाने लोकांना कमी व्याजाने पैसे देऊन त्यांचं लक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी ही स्कीम समोर आणली होती. अशाप्रकारे एक्स्ट्रा पैशांपर्यंत ती पोहोचली होती. चोरीच्या या केसमध्ये आधीच तीन अटक झाल्या आहेत. आता इनेसाला सुनावणीसाठी रशियात आणलं आहे.

टॅग्स :russiaरशियाCrime Newsगुन्हेगारी