JP Morgan: अमेरिकन कंपनी जेपी मॉर्गनबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 2015 साली कंपनीची माजी कर्मचारी मेगन ब्राउन नावाच्या महिलेवर कंपनीचा काचेचा दरवाजा पडल्याची घटना घटना घडली होती. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर या महिलेला अमेरिकन कोर्टातून मोठा दिलासा मिळाला. याप्रकरणी कोर्टाने त्या महिलेला 292 कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत.
जेपी मॉर्गनला मोठा धक्का मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकन कंपनी जेपी मॉर्गनची माजी कर्मचारी मेगन ब्राउनला कंपनीकडून मोठी भरपाई मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेगन काम संपवून ऑफिसमधून निघाली होती, तेव्हा तिच्या अंगावर काचेचा दरवाजा पडला होता. काच डोक्यावर पडल्याने तिच्या मेंदूला मोठा मार बसला. या अपघातामुळे ती एक वर्ष ऑफिसला जाऊ शकली नाही. तसेच तिची स्मरणशक्तीदेखील गेली.
अपघातामुळे महिलेने सर्वस्व गमावलेया अपघातामुळे तिला नोकरी गमवावी लागली. फक्त नोकरीच नाही, तर तिला तिची रोजची कामेही करता येत नव्हती. या अपघाताचा संपूर्ण व्हिडिओ कार्यालयातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या घटनेबाबत कंपनीने युक्तिवाद केला की, हा एक अपघात होता, जो थांबवता आला नसता. कंपनीने मेगनच्या दुखापतींच्या गांभीर्याबद्दल न्यायालयासमोर प्रश्न उपस्थित केले, परंतु न्यायालयाने कंपनीच्या युक्तिवादाकडे दुर्लक्ष केले. अखेर न्यायालयाने कंपनीला फटकारले असून महिलेला 292 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.