शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

टेरर फंडिंगवर जगभरात हाेणार कारवाई, २०० सदस्यीय टास्क फोर्सची सहमती, FATF मध्ये भारताचा मोठा विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 12:17 PM

गुन्हेगारी, दहशतवाद थांबवण्याच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) दहशतवादासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या क्राऊड फंडिंगबाबत एक महत्त्वाचा अहवाल प्रकाशित करण्यास सहमती दर्शवली असून, हा भारताचा मोठा विजय मानला जात आहे. एफएटीएफच्या ग्लोबल नेटवर्कची (२००हून अधिक सदस्यांची) चौथी बैठक आणि पॅरिसच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय संस्थांच्या निरीक्षकांनी दहशतवादाच्या वित्तपुरवठा गुन्हेगारीकरणावर कारवाई करण्यास सहमती दिली. पॅरिसमध्ये आयोजित तीन दिवसीय संमेलनाचा नुकताच समारोप झाला. सिंगापूरचे टी. राजा कुमार यांनी मतैक्याने अध्यक्षपद भूषवले. दहशतवादाला वित्त पुरवठा करणाऱ्या नेटवर्कचे विश्लेषण आणि सामायीकरण यासह एफएटीएफ मानकांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मंजुरी दिली.

गुन्हेगारी आणि दहशतवाद वाढवणाऱ्या आर्थिक प्रवाहाचा शोध घेणे, त्यांचा माग काढणे आणि ते थांबविण्याच्या मुद्द्यावर या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आले. या बैठकांना विविध देशांबरोबरच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, संयुक्त राष्ट्र, जागतिक बँक, इंटरपोल आणि एग्मॉन्ट ग्रुप ऑफ फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटही उपस्थित होते.

महत्त्वाचे निर्णय

    गुन्हेगारांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नास प्राधान्य देण्यास सहमती दर्शविण्यात आली.    एफएटीएफने आंतरराष्ट्रीय मनी लाँड्रिंग प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी मालमत्ता पुनर्प्राप्ती नेटवर्कची भूमिका आणि वापर मजबूत करण्याचा निर्णय घेतला.    सायबरद्वारे केली जाणारी फसवणूक, नागरिकत्वाचा गैरवापर आणि गुंतवणूक योजनांद्वारे बेकायदेशीर आर्थिक उलाढालींवरील अहवालही एफएटीएफने स्वीकारले. या बैठकीत मध्यपूर्वेतील स्थितीवरही चर्चा करण्यात आली.

दहशतवादी गटांवरही कारवाई

दहशतवाद्यांना त्यांच्या आर्थिक स्रोतांपासून तोडण्यासाठी आणि त्यांच्या पायाभूत सुविधा खिळखिळ्या करण्यासाठी आर्थिक निर्बंध आणि जप्तीसारखी पावले उचलण्यावरही सदस्यांनी सहमती दर्शविली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या संबंधित ठरावांनुसार घोषित करण्यात आलेले दहशतवादी आणि दहशतवादी गटांवरही कारवाईचा यात समावेश आहे.

टॅग्स :Terrorismदहशतवाद