लोकमत न्यूज नेटवर्ककोरोना व्हायरसनं अख्ख्या जगालाच एका अस्थिरतेच्या उंबरठय़ावर आणून ठेवलं आहे. ही अस्थिरता कधी संपले, जीवन सर्वसामान्य कधी होईल, काहीच सांगता येत नाही. अजूनही अनेक देश आपापल्या अपुर्या आरोग्य सेवेनिशी कोरोनाशी लढण्याचा प्रय} करताहेत. मृतांची संख्या रोज वाढतेच आहे. अख्खा जगाचा व्यापारउदीम जवळपास ठप्प झाला आहे. जागतिक व्यापार संघटनेनंही याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जगातला कोणताही देश यातून सुटणार नाही असं सांगताना जागतिक व्यापार संघटना वस्तुस्थितीवर नेमकं बोट ठेवते आहे. आजच्या घडीलाच कोरोनामुळे जागतिक व्यापाराला सुमारे तीस टक्के फटका बसला आहे. अनेक देशांसाठी हा आघात वेगवेगळा असला तरी कोणत्याही देशासाठी दोन आकड्यांपेक्षा कमी नाही. आयातीवर जसा परिणाम झाला आहे, तसाच निर्यातीवरही झाला आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या अभ्यासानुसार आधीच बहुसंख्य आशियाई देशांची निर्यात आयातीपेक्षा खूपच कमी आहे. पण जी काही निर्यात आहे, तीही आता ठप्प झाली आहे. याचा आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थेवर खूपच मोठा विपरित परिणाम झाला आहे. उत्तर अमेरिकेच्या निर्यातीलाही प्रचंड मोठा फटका बसला आहे. आशियाई देशांना या संकटातून सावरायचं तर त्यासाठी त्यांना लवकरात लवकर आणि अनेक आघाड्यांवर तातडीनं प्रय} करावे लागतील. तज्ञांचं म्हणणं आहे, नाहीतर आशियाई देशात भूकबळी वाढायला फार वेळ लागणार नाही. जागतिक व्यापाराच्या अनिश्चिततेची ही परिस्थिती किमान वर्षभर तरी चालेल, असा अंदाज आहे. तरीही खात्रीनं अजून काहीच सांगता येत नाही, कारण कोरोना आपली विखारी पंजे अधिकाधिक आवळतोच आहे, आणि त्यावर रामबाण इलाज अजून कोणालाही सापडलेला नाही. केवळ दोन महिन्यातच जागतिक व्यापारातील उलाढाल 12 ते 32 टक्क्यांनी कमी झालेली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंही यासंदर्भात धोक्याची घंटा वाजवलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे, कोरोनानं सगळ्या जगाच्याच डोळ्यांत पाणी आणलं आहे. केवळ तीन महिन्यांपूर्वी जागतिक विकास या वर्षी किमान 3.3 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आाला होता, पण विकास दूरच, आत्ताच्या घडीला जागतिक विकासात तब्बल तीन टक्क्यांनी घट झाली आहे. एका अभ्यासानुसार इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेचंही कंबरडं कोरोनानं मोडलं आहे. केवळ दुसर्या तिमाहीतच त्यांच्या अर्थव्यवस्थेला किमान 35 टक्के भगदाड पडेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. एकीकडे अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली, तर दुसरीकडे लोकांचे रोजगारही झपाट्यानं जाताहेत. उद्योगधंदे बंद पडल्यामुळे लाखो लोक बेघर होताहेत. सरकारच्या अधिकृत माहितीनुसार केवळ दोन महिन्यांत इंग्लंडमधल्या तब्बल वीस लाख लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. जागतिक अर्थव्यवस्था रुळावर आणायची तर आधी सर्व उद्योगधंदे पूर्ण क्षमतेनं सुरु व्हायला हवेत. ते सुरू झाले तरी लोकांची त्याला मागणी असली पाहिजे. कारण कोरोनानं आता लोकांचे प्राधान्यक्रमच पूर्णत: बदलून टाकले आहे. या परिस्थितीतून सावरायचं तर संपूर्ण जगालाच आपापले मतभेद बाजूला ठेवून जागतिक कल्याणाच्या दृष्टीनं पावलं उचलावे लागतील, असा सल्लाही तज्ञांनी दिला आहे.
जागतिक व्यापार जातोय रसातळाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 7:51 PM
जागतिक व्यापाराला सुमारे तीस टक्के फटका बसला आहे. अनेक देशांसाठी हा आघात वेगवेगळा असला तरी कोणत्याही देशासाठी दोन आकड्यांपेक्षा कमी नाही.
ठळक मुद्देकेवळ दोन महिन्यातच जागतिक व्यापारातील उलाढाल 12 ते 32 टक्क्यांनी कमी झालेली आहे.