हंगेरी - एखादी व्यक्ती कितीही अडचणीत असली अथवा दुःखी असली, की चांगले संगित अथवा गाणे त्या व्यक्तीला प्रसंन्न करते. एवढेच नाही, तर ताण-तणावात असताना मन हलके करण्यासाठी अनेक जण गाणे ऐकतात. काही लोक सॅड साँग ऐकनेही पसंत करतात. जर एखादी व्यक्ती प्रेमात पडलेली असेल तर तिला रोमँटिक गाणे ऐकायला अधिक आवडते. मात्र, आम्ही आपल्याला एका अशा गाण्यासंदर्भात माहिती देत आहोत, जे गाणे जगातील सर्वात जास्त खिन्न आणि उद्विग्न करणारे गाणे मानले गेले आहे. असे म्हटले जाते, की हे गाणे ऐकल्यानंतर लोक आत्महत्या करायचे. लोकांनी या गाण्याची एवढी धास्ती घेतली होती, की या गाण्यावर तब्बल 62 वर्षे बंदी घालण्यात आली होती.
हंगेरीतील एक संगितकार रेजसो सेरेज यांनी 1933 मध्ये 'सॅड संडे' अथवा 'ग्लूमी संडे' नावाचे एक गाणे तयार केले होते. असे म्हटले जाते की हे गाणे प्रेमावर आधारित होते. एवढेच नाही, तर हे गाणे हृदयाला ऐवढे भिडणारे होते, की ऐकणाऱ्यालाही आपल्या वैदनांची आठवण यायची. त्यामुळे हे गाणे ऐकून अनेकांनी आत्महत्या केल्याचे म्हटले जाते. सातत्याने होत असलेल्या आत्महत्यांनंतर लोक या गाण्याला अत्यंत वाईट गाणे, असे म्हणू लागले. यानंतर या गाण्यावर तब्बल 62 वर्षे बंदी घालण्यात आली होती. आत्महत्यांच्या घटना रोखण्यासाठी हे गाणे रिकंपोझही करण्यात आले होते. मात्र, तरीही लोकांच्या आत्महत्यांचे सत्र थांबले नाही. यानंतर या गाण्यावर 1941 मध्ये बंदी घालण्यात आली. ही बंदी 2003 मध्ये हटवण्यात आली आहे.
हे गाणे आजही यू-ट्यूबवर आहे. हे गाणे ऐकल्यानंतर अनेकांना समजत नाही, की या गाण्यात असे काय होते, की लोक हे गाणे ऐकल्यानंतर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलायचे. सांगण्यात येते, की या गाण्याचे लेखक रेजसो सेरेस आपल्या प्रेयसीवर प्रचंड प्रेम कायचे.
प्रेयसीने सोडली साथ -आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सेरेस संघर्ष करत होते. मात्र, यश मिळत नव्हते. रेजसो एक सुंदर पियानो वादक होते आणि त्यातच करिअर करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, त्याला यश न मिळाल्याने त्यांच्या प्रेयसीने त्यांची साथ सोडली. प्रेमात धोका मिळाल्याचा सेरेस यांना मोठा धक्का बसला. यानंतर आपल्या प्रेयसीच्या आठवणीत सेरेस यांनी एक गाणे लिहिले. या गाण्याला ग्लूमी संडे, असे नाव देण्यात आले. यानंतर या गाण्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि आत्महत्यांचे सत्रही सुरू झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!
15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लडाखवरून सुनावलं; आता अशी आली चीनची प्रतिक्रिया
CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!
CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!
CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस
CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर