शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

जगात कुठ्ठेही जा, ‘तो’ तुमच्या मागेच येईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 11:24 AM

तुम्हाला गणित हा विषय आवडतो? - आता या प्रश्नावर नक्कीच दोन प्रकारची मतं येतील. काही जण म्हणतील, नक्कोच गणित हा विषय. कशाला हवी ती डोकेउठाड? याच विषयामुळे आमच्यावर नापास व्हायची वेळ येते, आमचं वर्ष वाया जातं.

तुम्हाला गणित हा विषय आवडतो? - आता या प्रश्नावर नक्कीच दोन प्रकारची मतं येतील. काही जण म्हणतील, नक्कोच गणित हा विषय. कशाला हवी ती डोकेउठाड? याच विषयामुळे आमच्यावर नापास व्हायची वेळ येते, आमचं वर्ष वाया जातं. शालेय शिक्षणात गणित हा विषय कम्पल्सरी आहे, म्हणून तो शिकावा लागतो. एकदा का दहावी पास झालो ना, की मग त्या गणिताचं तोंडदेखील पाहणार नाही. मग बघा, माझ्या आयुष्यात कसा भराभ्भर प्रगती करतो ते! ज्यांचं गणितावर विशेष प्रेम आहे, ते म्हणतील, गणितासारखा दुसरा सोप्पा विषय नाही. गणिताची शिडीच तुम्हाला झटपट उंचीवर नेऊन पोहोचवते. शिवाय पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारा गणित हा एकमेव विषय आहे. गणित बरोबर सोडवलं असेल, तर जगातला कोणताही शिक्षक तुमचा अर्धा मार्कही कापू शकत नाही! 

अशी दोन्ही प्रकारची जुगलबंदी नेहेमीच चालू असते. पण, अनेकांना वाटतं, शालेय शिक्षण सोडलं तर पुढच्या आयुष्यात आपल्याला गणिताचा काडीचाही उपयोग होत नाही. मग, कशासाठी शिकायचं ते ‘किचकट’ गणित? - जगभरातल्या तज्ज्ञांचं मात्र याच्या बरोब्बर उलट मत आहे. तज्ज्ञ सांगतात, जगातलं असं एकही क्षेत्र नाही, जिथे गणिताचा उपयोग होत नाही! शालेय अभ्यासक्रमानंतर तुम्ही गणित सोडलं तरी गणित तुमचा पिच्छा सोडत नाही. त्यामुळे गणिताशी फटकून राहण्यापेक्षा त्याच्याशी दोस्ती केलेली केव्हाही चांगली. 

तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण कोणकोणत्या क्षेत्रात गणिताचा उपयोग होतो तुम्हाला माहीत आहे? - वाणगीदाखल ही उदाहरणं पाहा.. तुम्हाला नामांकित शेफ व्हायचंय, तुम्हाला शेतकरी व्हायचंय, तुम्हाला सुतार किंवा मेकॅनिक व्हायचंय, तुम्हाला शिक्षक, भाषातज्ज्ञ, दुकानदार, डॉक्टर, इंजिनीअर, संशोधक अगदी संगीतकार किंवा जादूगार व्हायचं असेल, तरीही त्यासाठी तुम्हाला गणित आवश्यक असतं. जाणतेपणी वा अजाणतेपणी गणिताचा वापर प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला करावाच लागतो. जगात कुठ्ठेही जा, काहीही करा, गणित हा विषय तुमचं शेपूट सोडणार नाही. तो तुमच्या मागे-मागेच येईल!माणसांचं जाऊ द्या, अगदी किडे, प्राणी, पक्षी.. यांनाही आपल्या दैनंदित जीवनात गणिताचा वापर करावाच लागतो. तो जर केला नाही, तर हरघडी अक्षरश: प्रत्येकाचं घोडं अडेल. पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास कसा करतात? आपला मार्ग ते कसा शोधतात? गोगलगायी त्यांचं कवच कसं बनवतात? कोळी त्यांचं जाळं कसं विणतात? मधमाश्या आपलं पोळं कसं बांधतात?.. - या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना गणिताचा वापर करावा लागतो. गणिताकडे खेळ, कोडं म्हणून पाहिलं, गणित आणि गेम्स यांचा संबंध मुलांना विणून दिला, तर त्यांना त्याची खूप मजा येते. गणित हा मग त्यांच्या आवडीचा विषय बनतो. आणि एकदा का गणिताची गोडी लागली, की मग ती सुटणं जरा अवघडच. गणितामुळे तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येते, मेंदू अधिक तल्लख होण्यास मदत होते, स्मरणशक्ती वाढते, प्रत्येक क्षेत्रातील तुमचा वेग आणि अचूकता वाढते, एवढंच काय, गणित तुम्हाला तुमचा पैसाही वाढवून देतं.. असे गणिताचे अनेक उपयोग आहेत.

गणित शिकल्यानं तुम्हाला काय फायदा झाला, काय फायदा होतो, यासंदर्भात अमेरिकेतील काही गणिततज्ज्ञ आणि अभ्यासकांनी नुकतंच एक व्यापक सर्वेक्षण केलं. त्यातल्या सहभागी सर्वच मुलांनी गणिताचं महत्त्व मान्य केलं. गणित हा विषय ज्यांच्या आवडीचा नव्हता, त्यांनीही गणिताचं असामान्यत्व मान्य केलं. या मुलांचं म्हणणं होतं, आम्ही मुलं गणिताचा बऱ्याचदा कंटाळा करतो, पण संगीत, कला, खेळ.. जीवनाचं कोणतंही क्षेत्र असो, प्रत्येक ठिकाणी गणित आहे.

मिआमी कंट्री डे स्कूलमध्ये संगीताचं शिक्षण घेणारा रेनान सांगतो, संगीतातही गणित इतकं एकरूप झालेलं आहे की तुम्ही ते वेगळं करूच शकत नाही. संगीतात ऑडिओ इंजिनीअरिंग, ऑडिओ सिग्नल्स, गिटारमधील ट्युनिंग सिस्टीम समजून घेण्यासाठीही गणिताची गरज पडते. त्यामुळे आपले विचार सुस्पष्ट होत जातात.

‘..तर चेहऱ्याचाही होतो बट्ट्याबोळ’! व्हॅक्युव्हर येथील युनियन हायस्कूलचे विद्यार्थी म्हणतात, प्रत्येक क्षेत्रात गणिताचं कसं योगदान आहे, हे आमच्या शिक्षकांनी आम्हाला समजावून सांगितलं आणि आमची दृष्टीच बदलून गेली. स्केटबोर्ड, बास्केटबॉल, घरात आपण खेळतो तो रुबिक्स क्यूब, स्केचिंग.. या सगळ्यातलं गणित आम्ही आता स्वत:च शोधून काढतो. चित्र काढताना एखादा चेहरा व्यवस्थित काढायचा असेल, तर त्याचं गणितीय प्रमाण समजलं नाही, तर त्या चेहऱ्याचा कसा बट्ट्याबोळ होतो, हेही आम्हाला आता समजलं आहे! तुम्हीही हे गणित समजून घ्या आणि मज्जा करा!

टॅग्स :Educationशिक्षण