नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे जगभरातील देशांचे सैन्यच रस्त्यावर आपत्कालिन मदतीसाठी उतरलेले असताना भारताविरोधात फुशारकी मारणाऱ्या पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे. पाकिस्तानी सैनिक या व्हायरसमुळे कामावर जाण्यासही घाबरू लागले आहेत. पाकिस्तानी लष्कराचे अने अधिकारी या व्हायरसच्या विळख्यात आले आहेत.
पाकिस्तानी सैन्याला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तेथील स्थानिक मिडीयानुसार पाकिस्तानी सैन्याचे कमीतकमी आठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यामध्ये तीन लेफ्टनंट कर्नल, दोन कर्नल, दोन ब्रिगेडिअर आणि एक मेजर जनरल रँकचे अधिकारी आहेत. ही माहिती पाकिस्तानी आरोग्य मंत्रालयानेच दिली आहे.
पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे. रावळपिंडीच्या जनरल हेडक्वार्टरमध्ये तपासणीवेळी या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानमध्येही कोरोनाचे 30 रुग्ण आढळले असून केवळ तीनच विमानतळ सुरू ठेवण्यात येणार आहेत. आतापर्यंत 9 लाख लोकांची तपासणी करण्यात आली आहे.
सिंध प्रांतामध्ये कोरोनामुळे 16 मे पर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. पाकिस्तान सुपर लीग मॅचही बंद दाराआड खेळविली जाणार आहे. यावेळी प्रेक्षक असणार नाहीत. जगभरात कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा दीड लाखांवर पोहोचला असून शंभरावर देशांमध्ये कोरोना फैलावला आहे. 5000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.