बोस्टन : मूळ भारतीय शास्त्रज्ञासह अमेरिकन शास्त्रज्ञांच्या गटाने सुपरसॉनिक लक्झरी विमान विकसित केले असून, हे विमान न्यूयॉर्क ते लंडन हे अंतर फक्त तीन तासांत पार करील, असा दावा केला आहे. बोस्टनमधील स्पाईक एरोस्पेस कंपनीचे एस-५१२ हे सुपरसॉनिक जेट २०१३ मध्ये सादर करण्यात आले होते; पण या विमानाच्या डिझाईनमध्ये आता काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. स्पाईक एरोस्पेसचे वरिष्ठ अभियंता अनुतोष मोईत्रा यांच्या म्हणण्यानुसार या विमानाच्या नव्या डेल्टा पंखामुळे विमान सुपरफास्ट गतीने जाऊ शकते. एस-५१२ विमानाच्या नव्या डेल्टा पंखामुळे विमानाला उच्च दर्जाची एरोडायनामिक क्षमता मिळाली असून, विमानाची उड्डाण क्षमताही विकसित झाली आहे. कमी गतीने व सुपरसॉनिक गतीने उड्डाण करण्याची क्षमता यामुळे विमानाला मिळाली आहे. (वृत्तसंस्था)
न्यूयॉर्कहून लंडनला जा फक्त ३ तासांत
By admin | Published: July 12, 2015 10:57 PM