पेशावर : येथील विमानतळावर उतरत असलेल्या एका पाकिस्तानी विमानावर अज्ञात बंदूकधा:याने मंगळवारी गोळीबार केला. यात विमानाची हानी न झाल्याने एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली; मात्र गोळी लागून एक प्रवासी महिला ठार, तर अन्य दोन जण जखमी झाले.
सौदी अरेबियातील रियाध येथून आलेले पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे (पीआयए) विमान काल रात्री पेशावर येथील बचा खान आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. सलग दोन मिनिटे गोळीबार सुरू होता. या विमानात 178 प्रवासी होते. गोळीबारात एक प्रवासी महिला ठार, तर वाजिद, एजाज हे दोन विमान कर्मचारी जखमी झाले. विमानतळाजवळील वस्तीतून हा गोळीबार करण्यात आलेला असू शकतो, असे एका पोलीस अधिका:याने सांगितले. हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलीस दल नजीकची वस्ती पिंजून काढत आहे.
वाजिद याच्या पायाला गोळी लागली आहे. तो म्हणाला, विमान 25क् ते 3क्क् फूट उंचीवर असताना विमानाच्या पाठीमागील भागाला गोळ्या लागल्या. सुदैवाने कॅप्टन तारिक चौधरी यांनी विमानाला विमानतळावर सुरक्षितरीत्या उतरवून एक मोठी दुर्घटना टाळली.
(वृत्तसंस्था)