नवी दिल्ली - कोरोना महामारीने जवळपास गेल्या 2 वर्षांपासून जगभरात थैमान घातलं आहे. पहिली लाट, दुसरी लाट आणि आता ओमायक्रॉनमुळे अनेक देशात कोरोनाची खबरदारी घेण्यात येत आहे. ओमायक्रॉनचे अनेक रुग्ण भारतात, महाराष्ट्रात आढळून आले आहेत. मात्र, हे रुग्ण कुठल्याही मोठ्या उपचाराशिवाय बरेही होत आहेत. कोरोनामुळे जगभरात आत्तापर्यंत 54 लाख लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पण, आता लवकरच जग कोरोनामुक्त होणार आहे. 2020 पर्यंत कोरोना महामारी संपुष्टात येईल, असे भाकितच WHO च्या वैज्ञानिकांनी केले आहे.
कोरोनाचा नवीन ओमायक्रॉन हा व्हेरियंट वेगाने पसरत असताना, कोरोना महामारी 2022 पर्यंत संपुष्टात येईल, हे आश्चर्यकारक वाटते. मात्र, डब्लूएचओच्या 100 पेक्षा अधिक शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसच्या भविष्याबाबत एक महत्त्वाचं भाकित केलं आहे. या 100 वैज्ञानिकांनी एक अहवाल तयार केला आहे. कोरोना महामारी नष्ट होण्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. 2022 पर्यंत कोरोना मृत्युमुखी पडलेल्या संख्या शुन्य होईल. सन 2022 मध्ये कोरोना समूळ नष्ट होणार नाही, पण ही महामारी राहणार नाही. नवीन वर्षात कोरोनासारखी महामारी केवळ ताप-सर्दीच्या आजारासारखी असेल. 2022 मध्ये कोरोना रोगापासून बचाव करण्यासाठी अनेक औषधे तयार होतील. पुढील 3-4 महिन्यात शेकडो कोरोनावरील औषधे बाजारात येतील. सन 2022 च्या शेवटापर्यंत कोरोना त्या स्थितीत पोहोचले, जसा 2018 मध्ये स्पेनिश फ्लू आणि 2009 मध्ये स्वाईन फ्लू होता. कोरोनाचे 99 टक्के रुग्ण घरीच बरे होतील. जगा मास्क फ्री होईल, पण आजारी व्यक्तींना मास्क घालणे बंधनकारक असेल.
WHO चं महत्त्वाचं ट्विट
डब्लूएचओ संघटनेनं ट्विट करुन महत्वाची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये कोरोना महामारी संपुष्टात येण्याचं सांगण्यात आलंय. महामारी जरी नष्ट झाली, तरी सामाजिक आव्हानं कायम असणार आहेत. डब्लूएचओचे डायरेक्टर जनरल यांनी हे ट्विट केलं आहे. गरिबी, जलवायू परिवर्तन, नक्षलवाद, असमानता आणि इतर सामाजिक समस्यांना आपणास तोंड द्यावे लागले, असे या ट्विटमध्ये लिहिले आहे.