शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

ओबामांचा अमेरिकींना अलविदा

By admin | Published: January 12, 2017 1:13 AM

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या भावनिक भाषणात अमेरिकी नागरिकांना अलविदा केला.

शिकागो : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या भावनिक भाषणात अमेरिकी नागरिकांना अलविदा केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीनंतर देशातील राजकीय वातावरणावर त्यांनी भाष्य केले. तर, लोकशाहीला वर्णव्देष, विषमता आणि भेदभाव यांच्यापासून निर्माण झालेल्या धोक्यापासून त्यांनी नागरिकांना सतर्क केले. ओबामा यांचा कार्यकाळ २० जानेवारी रोजी समाप्त होणार आहे. तर, रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. ओबामा (५५) यांनी येथे २० हजार नागरिकांना संबोधित केले. ते म्हणाले, बदल घडवून आणण्यासाठी माझ्या योग्यतेवर नव्हे, तर स्वत:वर विश्वास ठेवा. ५५ मिनिटांच्या आपल्या भाषणात ते म्हणाले की, आपण तो विश्वास कायम ठेवा जो आमच्या स्थापनेच्या दस्तऐवजात लिहिला गेलेला आहे. होय, आम्ही हे करु शकतो. लोकशाहीच्या संभाव्य धोक्याबाबत बोलताना ते म्हणाले की, जेंव्हा आम्ही भितीच्यासमोर झुकतो तेंव्हा लोकशाहीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. बाह्य आक्रमक गोष्टींपासून सतर्क रहायला हवे. आमचे मूल्य, तत्व यामुळेच आज आम्ही वर्तमान स्थितीत आहेत. ते मूल्य आम्ही जपले पाहिजे. ओबामा म्हणाले की, २००८ च्या कृष्णवर्णीय अध्यक्षाच्या रुपातील त्यांच्या ऐतिहासिक निवडीनंतरही वर्णभेद समाजात टिकून आहे. फुटीरवादी ताकदीच्या स्वरुपात हा वर्णभेद कायम आहे. आपल्या निवडीनंतर अशी चर्चा होती की, अमेरिका आता वर्णभेदाच्या पलीकडील देश असेल. पण, ही वस्तुस्थिती नाही, हे त्यांनी मान्य केले. दरम्यान, आगामी आठवड्यात ट्रम्प यांना सत्तेचे शांतीपूर्वक हस्तांतरण करण्याचा शब्द ओबामा यांनी दिला. मुस्लिम नागरिकांना देशात प्रवेशापासून रोखण्याच्या ट्रम्प यांच्या मुद्याचा धागा पकडून ओबामा म्हणाले की, ते लोकही तितकेच देशभक्त आहेत जितके आम्ही आहोत. (वृत्तसंस्था)पत्नी मिशेल, मुलींचे मानले आभार आपल्या निरोपाच्या भावनिक भाषणात ओबामा यांनी पत्नी मिशेल, मुली मालिया आणि साशा यांचेही आभार मानले. ओबामा म्हणाले की, आपल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी मिशेलने खूप त्याग केला आहे. ती माझी सर्वांत चांगली ‘मित्र’ आणि नव्या पिढीसाठी एक आदर्श आहे. येथे पहिल्या रांगेत मिशेल आपली लहान मुलगी मालिया आणि आईसोबत बसल्या होत्या. ओबामांनी मिशेल यांचे आभार मानले तेंव्हा त्यांच्या सन्मानार्थ सर्व उपस्थित जागेवर उभे राहिले. दरम्यान, मालिया आणि साशा यांच्याबद्दल बोलताना ओबामा म्हणाले की, अतिशय असामान्य परिस्थितीत आपण दोघी सुंदर आणि स्मार्ट तरुणींच्या रुपात समोर आल्या. पण, महत्वाचे हे आहे की, आपण खूप दयाळू , वैचारिक पाया असलेल्या आणि भरपूर उत्साह असलेल्या आहात. मी आयुष्यात जे काही केले आहे त्यात मला सर्वात जास्त गर्व याचा आहे की, मी अशा मुलींचा वडील आहे. ओबामा यांनी यावेळी उपाध्यक्ष जोए बाइडेन यांचेही आभार मानले. ते म्हणाले की, उमेदवार म्हणून तुम्ही माझी पहिली पसंत होतात. आपण एक चांगले उपाध्यक्ष होतात. तर, या काळात मला एक चांगला भाऊ मिळाला आहे.