Googleचा रशियाला आणखी एक धक्का; Play Store वर सरकारी मीडिया अॅप्स ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 03:39 PM2022-03-02T15:39:22+5:302022-03-02T15:39:53+5:30
Ukraine Russia War News : यापूर्वी Meta आणि Apple नंदेखील रशियाच्याविरोधात केली होती कारवाई.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात (Russian Ukraine War) गुगलने रशियन मीडिया चॅनेल (Russian Media Channel) ब्लॉक केले आहेत. गुगलने यासंदर्भातील माहिती दिली आहे. कंपनीने Google Play Store वर RT News आणि Sputnik शी संबंधित मोबाईल अॅप्स ब्लॉक केले आहेत. याआधी यूट्यूबने या दोन्ही माध्यमांशी संबंधित यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली होती.
विशेष म्हणजे, अनेक टेक कंपन्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर रशियन सरकारी माध्यमांवर बंदी घातली आहे. गुगलप्रमाणेच अॅपलनेही (Apple) या दोन न्यूज आउटलेटचे अॅप App Store मधून रिमूव्ह केले आहे. युक्रेनबद्दल चुकीची माहिती पसरवल्याबद्दल या वृत्तवाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
YouTube वर दोन्ही चॅनल्स झाले ब्लॉक
फेसबुकची मालकी असलेल्या मेटा कंपनीनंही RT आणि Sputnik चे पेजेस ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला होता. मेटा कंपनीचे जागतिक घडामोडींचे प्रमुख Nick Clegg यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली होती. युरोपीय देशांच्या आग्रहानंतर रशियाच्या सरकारी माध्यमांना ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं आहे.
ट्विटरनंही रिच केला कमी
YouTube नं RT आणि Sputnik या दोन्ही चॅनल्सवर युरोपातच बंदी घातली गेली आहे. आमची टीम संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याचं यूट्यूबच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. यूट्यूब आणि फेसबुकसोबतच ट्विटरनंही रशियन माध्यमांविरोधात कठोर पाऊल उचललं आहे. रशियाच्या सरकारी माध्यमांच्या ट्वीट्सचा रिच कमी केल्याचं ट्विटरच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.