अनिल भापकर
सध्या मेसेजिंग अॅप ची प्रचंड क्रेझ आहे. जणू काही हे मेसेजिंग अॅप म्हणजे लोकांच्या प्राथमिक गरजांपैकीच एक गरज झाले आहेत. या मध्ये व्हॉट्सअॅप , फेसबुक मेसेंजर ,हाईक आदी मेसेंजर अॅप ची चलती आहे. त्यामध्ये व्हॉट्सअॅपचा वापर जगभरात सगळ्यात जास्त होतो आहे.
दिवसेंदिवस व्हॉट्सअॅप आणि तत्सम मेसेंजर अॅप वापरणारे वाढतच आहे. आता या स्पर्धेत सर्च इंजिनचा बादशहा गुगलने पुन्हा उडी घेतली आहॆ. गुगलने एलो नावाचे स्मार्ट मेसेजिग अॅप आणण्याची तयारी केली आहे.
या अॅप मध्ये गुगलने आर्टिफ़िशिअल इंटेलिजन्सचा वापर केल्याचा दावा केला आहे. समजा तुम्हाला एखाद्या मेसेजला रिप्लाय द्यायचा असल्यास हे अॅप तुम्हाला शब्द सुचवणार आहे.
तुम्ही फ़क़्त योग्य शब्द सिलेक्ट केला कि झाला. त्यामुळे तुमचे टायपिंग चे श्रम वाचणार आहे. याशिवाय इतरही अनेक चांगले फिचर यामध्ये असणार आहे. सध्या या अॅपचे गुगल प्ले वर रेजिस्ट्रेशन सुरु आहे. गुगल एलो नावाने गुगल प्लेवर सर्च करून या अॅपचे रेजिस्ट्रेशन करता येते.