लंडन/नवी दिल्ली : भारतासह जगभरातील ‘गुगल’च्या कार्यालयातील कर्मचाºयांनी महिला कर्मचाऱ्यांना दिल्या जाणारी गैरवागणुकीच्या आणि लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबत कंपनीच्या मवाळ भूमिका निषेधार्थ गुरुवारी कार्यालयावर साखळी पद्धतीने बहिष्कार टाकला. ‘गुगल वॉकआऊट’ निदर्शनातहत गुगलच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी जगभरात अशा पद्धतीने निषेध व्यक्त केला.‘न्यूूयॉर्क टाइम्स’ने गुगलमध्ये महिलांचा लैंगिक छळ आणि आरोपी अधिकाऱ्यांना बडतर्फ करताना घसघशीत भरपाई देणे, तसेच लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध केला होता. त्यानंतर कर्मचाºयांनी या प्रकरणात कंपनीच्या अनास्थेच्या निषेधार्थ बहिष्काराचे हत्यार उपसले.लैंगिक छळाच्या आरोपांची प्रकरणे कशी हाताळली जावीत, यासंदर्भात काही महत्त्वपूर्ण बदल करण्याची कर्मचाºयांची मागणी आहे. लैंगिक छळ आणि भेदभावाच्या प्रकरणात कंपनीने ढवळाढवळ करू नये. वेतन आणि संधी यातील विषमता दूर करावी. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पारदर्शकता राखत कुठल्याही प्रकारे लपवाछपवी करू नये. लैंगिक अत्याचाराबाबत तक्रार करण्यासाठी एक स्पष्ट धोरण निश्चित करावे. अशा प्रकरणात पीडितेला सुरक्षा प्रदान करून तिच्याबाबत गोपनीयता राखली जावी. तसेच पीडितेला दावा करता यावा म्हणून जबरदस्तीने समझौता केला जाऊ नये, आदी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.गुगल कर्मचाºयांच्या जागतिक निदर्शनांची सुरुवात सकाळी ११.१० वाजता टोकियोत झाली. त्यावेळी इतर देशांतही याचवेळी निदर्शने करण्यात आली. सिंगापूरमध्ये शंभर कर्मचारी निषेध आंदोलनात सहभागी झाले होते. गुगलच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता त्यांनी भारतात १५० कर्मचारी बहिष्कार आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगितले. हैदराबाद, गुरगाव आणि मुंबईस्थित गुगलचे हे कर्मचारी होते. भारतातील गुगलच्या चार कार्यालयांत (हैदराबाद, गुरगाव, मुंबई आणि बंगळुरू) दोन हजार कर्मचारी आहेत.
गुगल’च्या कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 5:32 AM