वॉशिंग्टन: उद्योगपती तसेच पायलट गोपी थोटाकुरा पहिले भारतीय अंतराळयात्री बनणार आहेत. ॲमेझॉनचे संस्थापक उद्योगपती जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन एनएस-२५ मिशन या मोहिमेत गोपी थोटाकुरा एक अंतराळ पर्यटक म्हणून सामील होणार आहेत. या मोहिमेसाठी गोपी थोटाकुरा यांच्यासह सहाजणांची निवड झाली आहे.
१९८४ मध्ये भारतीय सेनेचे विंग कमांडर राकेश शर्मा अंतराळात गेले होते. शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे गोपी थोटाकुरा हे दुसरे भारतीय ठरणार आहेत. गोपी थोटाकुरा प्रिझर्व्ह लाईफ कोर्प या कंपनीचे सहसंस्थापक आहेत. त्यांच्याकडे व्यावसायिक विमान उड्डाणासोबत हॉट एअरबलूनमधून प्रवासाचा अनुभव आहे. आंध्र प्रदेशमध्ये जन्मलेल्या गोपी थोटाकुरा यांनी फ्लॉरिडा येथील एम्ब्री रिडल एअरोनॉटिकल यूनिव्हर्सिटीतून शिक्षण पूर्ण केले आहे.